कांद्याच्या दरामध्ये २ दिवसापासून स्थिरता, जाणून घ्या आजचे दर
सोयाबीन प्रमाणे इतर शेतमालावर देखील रशिया- युक्रेन युद्धाचा परिणाम होत आहे. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतल्या जाणाऱ्या कांद्याला तर आता अगदी कमी दर मिळत आहेत. दिवसेंदिवस कांद्याच्या दरामध्ये घट होत आहे.
सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यातीसाठी कंटेनर उपलब्ध नाहीत तर कांद्याची निर्यात ही लवकर करावी लागते अन्यथा कांदा कंटेनर मध्येच खराब होतो. मात्र आता निर्यातीवर निर्बंध लावण्यात आले आहे.
हे ही वाचा (Read This) आधुनिक शेती काळाची गरज, व्हर्टिकल फार्मिंग
युक्रेन – रशिया युद्धाचा परिणाम भारतातील शेतमालाच्या किमतींवर मोठ्या प्रमाणात होतांना दिसत आहे. तर कांद्याच्या आवक मध्ये वाढ झाली असून काही दिवसांपूर्वी दरात तब्बल ५०० ते ६०० रुपयांची घसरण झाली होती. तर आता काही ठिकाणी दर स्थिर आहेत तर काही ठिकाणी दरात अजूनही घसरण होत आहे.
कांद्याचे आजचे दर
हे ही वाचा (Read This) शेतकऱ्यांसाठी महत्वाचे, जिप्समचा वापर केव्हा आणि कसा करावा, काय घ्यावी काळजी ?
शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले
आधीच अवकाळीमुळे उत्पादनात मोठी घट झाली असून पिकांच्या लागवड आणि व्यवस्थापनासाठी अधिकचा खर्च लागला आहे. त्या खर्चाच्या तुलनेत अगदी कवडीमोलाचा दर मिळत आहे.
त्यात आता पेट्रोल , डिझेल , गॅस असे सर्वच गोष्टींच्या दरामध्ये वाढ झाली आहे.त्यामुळे शेतकरी अधिक चिंतेत असल्याचे निदर्शनास येत आहे.
युद्धामुळे रशियाने जहाजमार्गे निर्यातीवर बंदी केल्यामुळे आता शेतमालाच्या किमतींमध्ये वाढ होणार आहे.रशियाच्या निर्बंधामुळे गॅसची टंचाई निर्माण होऊन गॅसच्या दरामध्ये वाढ होण्याची शकता आहे.निकेल धातूला उच्चांक दर मिळत असल्यामुळे अलंकार, दागिन्यांचे धातुकाम, रासायनिक उपकरणे, सागरी उपकरण यांच्या किमतींमध्ये वाढ होणार आहे.
तांब्याच्या किमतीही आता वाढल्या आहेत. त्यामुळे विद्युत जनित्रे व चलित्रे (मोटारी), विद्युत संवाहक तारा, केबल, गज, मोटारगाडीतील उपकरणे, दारुगोळा, रेडिओ, दूरचित्रवाणी, घड्याळे देखील महाग होण्याची दाट शक्यता आहे.