२ दिवसापासून स्थिरावलेल्या सोयाबीनच्या दराचा पुन्हा भडका, या मार्केटमध्ये ८ हजार भाव
सोयाबीनच्या दरामध्ये सुरुवातीपासूनच चढ उतार होत असतांना आपण पहिले आहे. तर सोयाबीनला कधी कवडीमोल भाव मिळत होता तर कधी उच्चांकी भाव. आता रशिया – युक्रेन युद्ध सुरु झाल्यापासून दरामध्ये अधिक तफावत दिसून येत आहे.
हे ही वाचा (Read This) शेतकऱ्यांसाठी महत्वाचे, जिप्समचा वापर केव्हा आणि कसा करावा, काय घ्यावी काळजी ?
मागील २ दिवसापासून सोयाबीनचे दर हे ७ हजार ४०० रुपयांवर स्थिर होते. तर आता नागपूर मध्ये कमीतकमी दर ६ हजार ४०० रुपये तर जास्तीत जास्त दर ८ हजार रुपये मिळत आहे. तर दुसरीकडे उन्हाळी सोयाबीन शेतामध्ये बहरतांना दिसत आहे.
सोयाबीनचे आजचे दर (Soybean today’s rate )
हे ही वाचा (Read This ) एका एकरात करा या झाडाची लागवड, नक्कीच बनवेल करोडपती
खरीप हंगामात अतिवृष्टी, अवकाळीमुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे सोयाबीनचे उत्पादन कमी प्रमाणात झाले असून शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीनच्या दराकडून अधिक अपेक्षा होती.
मात्र सोयाबीनला चांगले दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली होती. तर टप्याटप्याने त्याची आवक सुरु केली होती. मात्र सोयाबीनच्या दराच्या सततच्या चढ उतारामुळे शेतकरी अनेकदा प्रश्नात पडला होता. मात्र शेतकऱ्यांनी संयमाने निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.
हे ही वाचा (Read This) आधुनिक शेती काळाची गरज, व्हर्टिकल फार्मिंग
अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनचे दर थोडे चढे होताच त्यांची विक्री केली. तर आता काही प्रमाणातच सोयाबीन साठवलेला असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.
उन्हाळी सोयाबीनची (summer soybean) काय आहे स्थिती ?
उन्हाळी हंगामातील सोयाबीनला लवकरच शेंगा लागणार आहेत. उन्हाळी सोयाबीनचा प्रयोग हा कमी क्षेत्रात पाण्याची उपलब्धता बघून केला आहे.
शेतकऱ्यांनी स्प्रिक्लंर, ठिबकचा वापर करून पिकाची जोपासना केली आहे. सोयाबीनला मुबलक दर मिळाले नाही तरी भविष्यातील बियाण्यांचा प्रश्न मिटणार आहे.
उन्हाळी सोयाबीनचा पेरा मोठ्या संख्येने झाल्यामुळे खरिपातील बियाण्यांची चिंता मिटली असून शेतकऱ्यांची धावपळ कमी होणार आहे. इतकेच काय तर बियाण्यांची खरेदी करतांना होत असलेली फसवणूक टळणार आहे