२ दिवसापासून कांद्याच्या दरात स्थिरता, जाणून घ्या आजचे दर
सध्या रशिया आणि युक्रेन मध्ये होत असलेल्या युद्धामुळे कांदा निर्यातीवर निर्बंध लागले आहेत. त्यामुळे कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे. मागील ८ दिवसांमध्ये लाल कांद्याच्या दरात ७६४ रुपयांची तर उन्हाळी लाल कांद्याच्या दरात ६३० रुपयांची घसरण झाली होती.
हे ही वाचा (Read This) रशिया-युक्रेन युद्धामुळे गव्हाचे भाव गगनाला भिडणार?
सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यातीसाठी कंटेनर उपलब्ध नाहीत तर कांद्याची निर्यात ही लवकर करावी लागते अन्यथा कांदा कंटेनर मध्येच खराब होतो. त्यामुळे सध्या केंद्र सरकारने शेतमाल निर्यातीवर निर्बंध लावले आहेत.
कांद्याचे आजचे दर
इतर गोष्टींच्या दरावर देखील परिणाम …
सध्या युक्रेन-रशिया युद्धामुळे सोयाबीन सह खाद्यतेल, गहू, तांबे, पोलाद, ऍल्युमिनिअम यांच्या किमतींमध्ये देखील वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे.
खाद्यतेलाच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. अजून ६ महिने खाद्यतेल पुरेल एवढा साथ असून देखील खाद्यतेलाच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. याच परिणाम शेतीबरोबर खाण्यापिण्याच्या पदार्थांच्या किमतीवर होणार आहे.
ही वाचा (Read This) सोयाबीन लवकरच १० हजार पार ? शेतकऱ्यांचा नव्हे व्यापाराचा फायदा