युक्रेन- रशिया युद्धामुळे कापसाच्या दरात घट ?
अवकाळीमुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाल्यामुळे कापसाला आता पर्यंत चांगला दर मिळत होता. त्यामुळे कापूस उत्पादकास थोडा दिलासा मिळत होता. मात्र आता सध्या युक्रेन – रशिया युद्धामुळे कापसाच्या दरात काही ठिकाणी स्थिरता तर काही ठिकाणी घट होत आहे.
यंदा कापसाला ११ हजार पर्यंतचा विक्रमी दर मिळाला होता. मात्र आता या दरामध्ये घसरण होतांना दिसत आहे. पाच महिन्यांपूर्वी कापसाला ५ हजाराचा दर होता आता पुन्हा कापसाचा दर ५ हजाराकडे जातो की काय अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.
कापसाचे आजचे दर
युक्रेन आणि रशियाच्या युद्धाचा परिणाम हा जवळजवळ सर्वच शेतमालावर होत आहे. कापसाच्या दरात घट होण्याचे एक कारण हे देखील आहे.
युद्धामुळे शेतमाल निर्यातीवर निर्बंध लावण्यात आले असून सोयाबीनच्या दरामध्ये १ हजार रुपायांनीं वाढ झाली असून तेलाच्या दरात देखील अचानक वाढ झाली आहे.
हे युद्ध जर असेच सुरु राहिले राहिले तर दरामध्ये अधिक तफावत येईल. त्यामुळे लवकरात लवकर हे युद्ध थांबावे आपण अशीच अपेक्षा करू शकतो.