पंतप्रधान फसल विमा योजना : योजनेचा लाभ घेण्यासाठी मोजकेच दिवस उरलेत… !
शेतकरी राजाच्या समृद्धीसाठी आणि विकासासाठी राज्य व केंद्र सरकार वेळोवेळी नवनवीन योजना राबवत असते, ज्याद्वारे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारून त्यांचा सर्वच बाजूंने विकास व्हावा. पंतप्रधान फसल बीमा योजना (Prime Minister’s Crop Insurance Scheme) ही अशीच एक योजना ज्यात पिकांचे नुकसान झाले तरी शेतकऱ्यांना विम्याच्या स्वरूपात रक्कम देता यावे. म्हणजेच या योजनेमध्ये पिकांना विम्याचे कवच दिले जाते.
खरिप हंगामातील पिकांसाठी विशेष करुन मका, बाजरी, कापूस यासह इतर पिकांचा विमा हप्ता भरण्याची मुदत 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. या योजनेत सहभाग नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांना पिकाची पेरणी केल्यानंतर दहा दिवसात सहभाग नोंदवण्याची गरज आहे.
पी.एम. पीक विमा योजनेमध्ये नाव नोंदवणे ऐच्छिक करण्यात आले आहे, म्हणजेच या योजनेमध्ये भाग नोंदवायचा की नाही हे पूर्णपणे शेतकऱ्यांवर अवलंबून आहे. जे शेतकरी किसान क्रेडिट कार्ड (KCC) धारक आहेत त्यांना पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी लागेल. ज्या शेतकऱ्यांना सहभागी व्हायचं आहे त्यांच्या कर्जामधून योजनेचा प्रीमियमम (Premium) कापला जाईल.
या योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख 24 जुलै आहे. किसान क्रेडिट धारक (Kisan Credit Holder) शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी व्हायचे असल्यास मुदतीपूर्वी म्हणजेच 24 जुलैपर्यंत बँकाना कळवावे लागणार आहे. अन्यथा त्यांचा पी.एम. पीक विमा योजनेत समावेश केला जाणार आहे.
ब्युरो रिपोर्ट – *किसानराज डेस्क