सोयाबीनच्या दरात स्थिरता ? मिळेल का ९ हजाराचा दर ?
मागील काही दिवसांपासून स्थिर असलेल्या सोयाबीनच्या दरात अचानक वाढ झाली आहे. याचे कारण म्हणजे युक्रेन आणि रशिया यांमधील युद्ध.
सोयाबीनचे उत्पादन यंदा कमी आले असून अवकाळी, अतिवृष्टीचा परिणाम सोयाबीनच्या पिकांवर झाला होता. उत्पादन कमी येऊन देखील दर अपक्षेप्रमाणे मिळत नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांनी विक्रीपेक्षा साठवणुकीवर जास्त भर दिला होता.
आता सोयाबीनच्या वाढत्या दरामुळे साठवणूक केलेले सोयाबीनची आवक होतांना दिसून येत आहे. मात्र अजूनही युद्धाची स्थिती लवकर निवळेल असे वाटत नसल्यामुळे दरात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.युद्ध संपले तर सोयाबीन पुन्हा ६५०० वर येईल, अन्यथा ते ९००० रुपये प्रति क्विटलपर्यंत जातील, असा अंदाज आहे.
सोयाबीनचे दर
सध्या सोयाबीनचे दर हे साडेसात ते आठ हजार रुपये झले असून या दरात स्थिरता आहे. मागील वर्षी सोयाबीनला उच्चांकी दर मिळाला होता. तर लासलगाव मध्ये तर सोयाबीनला १० हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला होता.
सोयाबीनचा खर्च आणि उत्पादन यामध्ये मोठी तफावत …
हंगामाच्या सुरुवातीला पाऊस पडल्यामुळे सोयाबीनची दुबारा पेरणी करावी लागली होती तर त्यामुळे शेतकऱ्यांचा अधिकच खर्च झाला होता. मात्र तरीही सोयाबीनला अगदी कवडीमोल भाव मिळत होता. त्यात सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली होती. आता मात्र सोयाबीनच्या दरात वाढ होतांना दिसत आहे
औषध, कीटकनाशक, रासायनिक खत यांच्या किमती वाढल्या आहेत सोयाबीनचे अधिक ‘उत्पादन येण्यासाठी एकरी उत्पादन खर्च वाढला आहे. त्या तुलनेत सोयाबीनला मिळाणारा दर खूपच कमी आहे. त्यामुळे दरात अधिक वाढ झाल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल.