पिकपाणी

अश्यापद्धतीने करा हळद लागवड, मिळवा भरगोस उत्पन्न

Shares

हळद ही अत्यंत बहुगुणी आहे. हळदीचा उपयोग मसाले, औषध, रंगरंगोटी, सौंदर्यप्रसाधने आणि धार्मिक विधींमध्ये केला जातो. भारतामधून हळदीचे मोठ्या संख्येने निर्यात केली जाते.हळदीची लागवड व निर्यातीत भारत जगात प्रथम स्थानावर आहे. भारतात आंध्र प्रदेश, ओरिसा, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि केरळपाठोपाठ महाराष्ट्रात हे पीक घेतले जाते.हळदीची लागवड सहजतेने केली जाऊ शकते आणि कमी किंमतीचे तंत्रज्ञान स्विकारून देखील हळदीचे उत्पन्न चांगले घेऊ शकतो. भारतामधून फ्रान्स, जपान, जर्मनी, अमेरिका आदी देशांमध्ये निर्यात केली जाते. तर हळदीमध्ये अनेक गुणधर्म दडलेले आहेत. त्यामुळे बाराही महिने हळदीला मोठ्या संख्येने मागणी असते.

जमीन, हवामान आणि तापमान

१. हळद लागवड करायची असेल तर जमीन सुपीक असणे गरजेचे आहे.
२. योग्य निचरा असलेल्या वालुकामय चिकणमाती जमिनीत हळदीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेता येते.
३. जमिनीचे pH मूल्य ५.५ ते ७.५ दरम्यान असावे.
४. हळदीच्या झाडांना उष्ण व दमट हवामान आवश्यक असते. परंतु उष्ण व थंड हवामान त्याच्या पिकासाठी हानिकारक आहे.
५. त्याच्या बियांचे उगवण होण्यासाठी सुरुवातीला २० अंश तापमान असणे आवश्यक आहे आणि रोपांच्या वाढीसाठी सामान्य तापमान असणे गरजेचे आहे.

पाणी व्यवस्थापन

१. पावसाळयाच्या सुरुवातीस हळदीच्या बियाण्याची लागवड केली जाते. त्यामुळे प्राथमिक सिंचनाची गरज भासत नाही.
२. वेळेवर पाऊस न पडल्यास शेताला पाणी द्यावे लागते.
३. पावसाळ्यानंतर, हळदीच्या झाडांना २५ दिवसांच्या अंतराने पाणी दिले जाते.
४. या पिकाला फक्त ४ ते ५ वेळा पाणी द्यावे.

काढणी

१. लागवडीनंतर साधरणतः ७ महिन्यात हे पीक काढणीस तयार होते.
२. झाडांची पाने सुकण्यास सुरुवात झाली की काढणीस सुरुवात करावी.
३. कंद काढण्यापहिले शेतास पाणी द्यावेत. जेणेकरून कंद काढणे सोपे होईल.
४. कंद काढल्यानंतर ते पाण्याने चांगल्या पद्धतीने धुवून घ्यावे.
५. त्यानंतर त्यास सावलीत वाळवावेत.
६. हळद वाळल्यानंतर बाजारात विक्रीसाठी पाठवण्यास तयार होते.

उत्पादन
१. हळदीचे प्रति हेक्टरी प्रमाणे २५० ते ६०० क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते.
२. हळदीला प्रति क्विंटल ६ ते १० हजार रुपये भाव आहे.

टीप
हळद 10 ग्रॅम सोडियम बायकार्बोनेट प्रति लिटर उकळत्या पाण्यात टाका. त्यानंतर ते पाण्याबाहेर काढून सावलीच्या जागी वाळवावी. त्यामुळे हळदीला आकर्षित रंग येऊन बाजारात चांगला भाव मिळतो.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *