शेजाऱ्याने लावली ऊसाला आग , ही कसली दुश्मनी ?
बीड जिल्ह्यातील अंबेजोगाईमध्ये एक वेगळाच नवीन प्रकार घडला आहे.शेजारच्या शेतकऱ्याने तोडणीस आलेला ऊसाला काडी लावल्याची घटना समोर आलेली असून मराठवाड्यात अश्या घटनांची मोठ्या प्रमाणात नोंद होत आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात न भरून निघणारे नुकसान होतांना दिसून येत आहे. पिकास आग लागण्याच्या अनेक घटना या विद्युत वाहिण्यांच्या घर्षणामुळे होतांना दिसून येत असून नुकतेच अश्याच काही घटना औरंगाबाद आणि लातूर मध्ये घडल्यामुळे महावितरणकडून थोडी आर्थिक मदत मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. मात्र आता बीड जिल्ह्यातील अंबेजोगाईमध्ये एक वेगळा प्रकार समोर आला आहे. एका ऊस शेतकऱ्याने तोडणीला आलेल्या ऊसाच्या बागेत काडी लावल्याचा प्रकार समोर आला आहे. शेतकऱ्याने आकसापोटी तोडणीस आलेल्या ऊसाला काडी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे अधिक नुकसान झाले आहे.
हे ही वाचा (Read This) कांद्यानी केला वांदा, रेकॉर्डब्रेक आवक !
लाखों रुपयांचे झाले नुकसान
नगदी पिकांपैकी ऊस हे सर्वात मोठे आणि महत्वाचे पीक मानले जाते. यंदा खरिपात अतिवृष्टीमुळे या पिकाचे मोठ्या संख्येने नुकसान झाले होते तर रब्बी हंगामात ऊस उत्पादनात घट होण्याचा धोका आहे. अवघ्या काही दिवसातच ऊसाची तोडणी होणार होंती मात्र शेतकऱ्याच्या या कृत्यामुळे लवकर न भरून निघणारे असे लाखोंचे नुकसान झाले आहे. लगतचे पाचट जाळताना असे घडले असल्याचे शेजारच्या शेतकऱ्याचे म्हणणे असले तरी आता हे नुकसान कोण भरून देणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
ऊस जळून झाला खाक
मागील काही महिन्यांपासून निसर्गाच्या लहरीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात पिकांचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे. अधिकच्या पावसाचा केवळ ऊस या नगदी पिकावरच परिणाम झालेला नव्हता. त्यामुळे ममदापूर येथील शेतकऱ्याला यातूनच अधिकच्या उत्पादनाची अपेक्षा होती. शिवाय आता काही दिवसांमध्ये ऊस तोडणी होऊन कारखान्यावर जाणार होता. मात्र, शेजारच्यानेच उभा ऊस पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.