कापसाला मिळाला उचांकी दर, कापूस ११ हजार पार
अवकाळी पडलेल्या पावसामुळे कापसाच्या पिकावर विपरीत परिणाम झाला होता याचा परिणाम कापूस दरावरही झालेला आढळून आला होता. मात्र आता इतिहासात प्रथमच कापसाला सर्वात उचांक असा भाव अकोला जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळाला आहे. कापसाला ११ हजार रुएए एवढा भाव मिळाल्यामुळे कापूस शेतकऱ्यांच्या आनंदाने आकाश गाठले आहे. पहिल्यांदाच कापसाला इतका दर मिळाला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. या वेळेस कापसाचे उत्पादन कमी झाले असले तरी त्याच्या दरात वाढ झाली आहे. कापसाला मिळलेला ११ हजार हा दर आता पर्यंतचा विक्रमी दर आहे. अवकाळी मुळे कापूस पिकावर बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला दिसून येत होता तर बहुतांश कापूस हा ओला झाला होता. त्यानंतर शेतकऱ्यांनी टप्याटप्याने कापसाची आवक करण्यास सुरुवात केली होती.
हे ही वाचा (Read This) कांद्यानी केला वांदा, रेकॉर्डब्रेक आवक !
शेतकऱ्यांना मिळाला हमीभावापेक्षा अधिक दर
कापसाला यंदा ११ हजार रुपये असा विक्रमी दर मिळाला असून सीसीआय ने कापसाच्या मध्यम धाग्यास ५७७५ तर लांब धाग्यास ६१०० असा हमीभाव ठरवून दिला असल्यामुळे अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा ५ हजार रुपये अधिक मिळत आहे.
परदेशात कापसाची निर्यात
अकोटच्या बाजारपेठेतील कापसाच्या रुईचे प्रमाण जास्त तर सरकीची जाडी कमी असल्यामुळे या बाजारपेठेतून कापसाला अधिक जास्त प्रमाणात मागणी होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देखील याची मागणी वाढतांना निदर्शनात येत असून बांग्लादेश तसेच चीनमध्ये याची निर्यात अधिक प्रमाणात होत आहे.
१२ हजाराचा टप्पा पार करण्याची दाट शक्यता
बाजारपेठेत कापसाची तेजी दिसून येत असून कापसाच्या विक्रमी दराबरोबर त्याची मागणी देखील वाढत आहे. कापसाची सध्याची तेजी बघता लवकरच कापूस १२ हजाराचा टप्पा पार करेल अशी शक्यता दर्शवली जात आहे. गेल्या काही वर्षांपासून कापसाच्या बाजारभावात जास्त तेजी दिसून येत नव्हती तर आता मात्र सगळीकडे या पांढऱ्या सोन्याची चर्चा सुरू आहे.