इतर बातम्या

कांद्यानी केला वांदा, रेकॉर्डब्रेक आवक !

Shares

सध्या कांद्याची आवक मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये मोठ्या संख्येने होतांना दिसून येत असून सोलापूरमध्ये कांद्याची रेकॉर्ड ब्रेक आवक होतांना निदर्शनास येत आहे तर बाजार समितीमध्ये कांद्यास सरासरी दर मिळत आहे. मागील महिन्यात सोलापूरमध्ये २ वेळा कांदयाची आवक विक्रमी झाली तर लासलगाव लागोपाठ कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून सोलापूरची ओळख निर्माण झाली आहे. या बाजारपेठेत एकाच दिवशी चक्क १ लाख २६ हजार क्विंटल कांद्यांची आवक झाली आहे. लासलगाव हुन अधिक प्रमाणात कांदा हा सोलापूरमध्ये दाखल झाला असल्याचे चित्र दिसून येत आहे. मागील महिन्यात कांद्यास किमान दर १३०० तर कमाल दर २६०० असा मिळत होता.

कांद्याची आवक वाढण्याची कारणे नेमकी कोणती ?
नगदी पिकांमध्ये कांदा पीक सर्वात महत्वाचे मानले जाते. शेतकऱ्यांना कांद्याच्या दराकडून नेहमी अपॆक्षा असून सोलापूर कृषी बाजार पेठेमध्ये ही अपेक्षा साध्य होत असतांना दिसत आहे. इतर बाजारसमितीशी तुलना केल्यास असे निदर्शनात येते की, या बाजार पेठेत शेतकऱ्यांना अधिक्य दर मिळत असून कांद्याचा काटा केलेल्या दिवशीच त्यांना पैसे मिळत आहेत. नेहमी डिसेंबर महिन्यात कांद्याची आवक वाढत असते मात्र या वेळेस पावसामुळे कांदा लागवडीसाठी उशीर झाला असल्यामुळे डिसेंबर महिन्यात कमी आवक झाली होती. आता मात्र कांद्याची आवक वाढली आहे.

हे ही वाचा (Read This) रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या या औषधी वनस्पतींच्या मागणीत वाढ

कमी जागेत जास्त उत्पादन घेण्याचे तंत्र
सततच्या बदलत्या वातावरणामुळे कांदा पिकावर अनेक परिणाम होतांना दिसून येत होते. मात्र शेतकऱ्यांनी पिकांची वेळोवेळी गरजेनुसार काळजी घेतल्यामुळे चांगले उत्पादन झाले आहे. शेतकऱ्यांनी कमी जागेत जास्त उत्पादन घेण्याच्या तंत्राचा वापर केल्यामुळे पिकांचे नुकसान टाळता आले असून त्यांना याचा अधिक प्रमाणात फायदा झाला आहे. बाजार समितीमधील व्यवहार तसेच शेतकऱयांनी घेतलेली काळजी यामुळे कांद्याची आवक वाढतांना दिसून येत आहे.

व्यवहार बंद ठेवण्याच्या निर्णयाचा कांदा आवक वर काही परिणाम झाला का ?
शासनाने १५ जानेवारी नांतर २ वेळेस बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता याचे कारण म्हणजे कांदयाची जास्त प्रमाणात वाढती आवक हे होते. मात्र याचा काहीही परिणाम कांद्याच्या आवक वर झाला नाही त्याचबरोबर कांदा दरावरही या निर्याणाचा परिणाम झालेला नसला तरी कांदा उत्पादक संघटनेने बाजारपेठ बंद ठेवल्यास आम्ही आंदोलन करू असा आक्षेप नोंदवला आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *