कापसाला १०४४० रुपये पहिल्यांदा एवढा भाव..
मागील आठ दिवसापासून कापसाचे दर सतत वाढत आहेत, आठ दिवसापूर्वी कापसाचे दर ९४०० च्या जवळपास होते आता कापसाचे दर १०५०० च्या जवळपास आले आहेत. शेतकऱ्यांसाठी हि आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण मागील ५० वर्षात पहिल्यांदा कापसाला एवढा भाव मिळाला आहे.
यंदाच्या वर्षी कापसाचं उत्पन्न कमी झालेलं असून बाजारपेठेत मात्र मागणी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील कापसाच्या दराने उच्चांक गाठला आहे. फुलसावंगी बाजार पेठेत कापसाला १०,४०० रुपये भाव मिळाला असून यवतमाळ, राळेगाव आणि वणी बाजारपेठेतही कापसाचा दर १०४४० रुपये प्रति क्विंटलहून अधिक झालाय.
मागील ५० वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा शेतकऱ्यांना पहिल्यांदा एवढा भाव मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्याचा आनंद द्विगुणी झाला, जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी सुखावला आहे. मागणी वाढली आणि पुरवठा कमी झाल्यामुळे मागील आठ दिवसांपासून कापसाचे दर सारखे वाढत होते.