तुरीच्या बाजारभावात बदल तर सोयाबीनचे दर स्थिर
तुरीचे हमीभाव केंद्र सुरु होण्यापूर्वी तुरीचे दर हे कधी ६ हजाराहून जास्त झाले नव्हते. परंतु आता तुरीच्या बाजारभावात मोठा फरक आढळून येत आहे. तुरीला हमीभाव केंद्रावर ६ हजार ३०० रुपये दर निश्चित करण्यात आला असून बाजारभावातील दर वाढल्याने हमीभाव केंद्राकडे (Farmer) शेतकरी आता पाठ फिरवतांना दिसत आहे. हमीभाव केंद्र सुरु होण्यापूर्वी कधी दर हे ६ हजारापेक्षा अधिक झालेच नाहीत. परंतु व्यापाऱ्यांनी (Traders) आपली भूमिका बदल्याचे चित्र दिसून येत आहे. दुसरीकडे सोयाबीनचे दर (Soybean Rate) मागील आठ दिवसांपासून स्थिरच आहेत. शिवाय आवक ही वाढत असून शेतकरी आता साठणूक केलेल्या मालाची विक्री करत आहे.
हे ही वाचा (Read This) बाराही महिने या पिकापासून मिळवा भरगोस उत्पन्न.
तुरीच्या दरात झालेला बदल
खरीप हंगामातील शेवटच्या टप्प्यात असलेल्या तूरीची बाजारपेठेत आवक सुरु झाली असून हंगामाच्या सुरवातीला तुरीचे दर हे ५ हजार ७०० ते ५ हजार ९०० च्या दरम्यान होते. परंतु राज्यात हमीभाव केंद्र ही सुरुच झाले नव्हते . नाफेडने हमीभाव केंद्रावर तुरीला ६ हजार ३०० चा दर ठरवेलेला आहे. परंतु जानेवारी रोजी राज्यात १८६ ठिकाणी हमीभाव केंद्र ही सुरु झाली आहेत. त्यापूर्वी कधीही तूरीचे दर हे वाढलेले नव्हते. या आठ दिवासाच्या कालावधीमध्ये बाजारातील तूरीच्या दराने हमीभाव दराचा टप्पा ओलांडल्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांनी केंद्राकडे पाठ फिरवून व्यापाऱ्यांकडे विक्री सुरु केली आहे.
हंगामाचा शेवट गोड …
यावेळेस दरात घसरण झाल्यास विक्रीपेक्षा साठवणूकीवरच शेतकऱ्यांनी जास्त भर दिलेला होता. त्यामुळे अंतिम टप्प्यात या दोन्हीही पिकांच्या किंमती वाढल्या आहेत. तर आता तूरीची आवक सुरु झाली असून ५ हजार ८०० वरील दर आता ६ हजार ६०० पर्यंत गेले असल्यामुळे हंगामाचा शेवट हा चांगला होताना दिसत आहे.
सोयाबीनच्या दरासह आवक देखील स्थिर
सोयाबीनच्या दराची चर्चा सुरुवातीपासून होत असून त्याच्या दरात सतत चढ – उतार होत होता. आता मात्र सोयाबीनच्या दरात स्थिरता निर्माण झाली आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १८ ते २० हजार पोत्यांची आवक सुरु असून साठवणूक केलेला सोयाबीन आता विक्रिसाठी बाजारात येत आहे.