योजना शेतकऱ्यांसाठी

या योजनेचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी घेतला सर्वात जास्त लाभ, शेवटची तारीख १५ फेब्रुवारी

Shares

सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत असतो. सर्वसामान्य शेतकऱ्यांना या योजनांचा ( Government Scheme) लाभ मिळावा या उद्देशाने सरकार अनेक प्रयत्नही करतो. यासाठी सरकार किसान क्रेडीट कार्डवर (Kisan Credit Card) जास्त भर देण्याचा प्रयत्न करत आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना सावकराकडून कर्ज घेण्याची वेळ येणार नाही तसेच याचा लाभ शेतकऱ्यांना घेता येणार आहेच त्याचबरोबर आता पशूपालक आणि मासे उत्पादक शेतकऱ्यांनाही याचा लाभ घेण्यात यावा यासाठी प्रक्रिया सुरु आहे. किसान क्रेडिट कार्डचा लाभ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सर्वाधिक घेतलेला असून राजस्थान, उत्तरप्रदेश आणि आंध्रप्रदेश येथील शेतकऱ्यांनी हे कार्ड काढले आहे. मार्च २०२० ते नोव्हेंबर २०२१ या काळामध्ये देशभरात २ कोटी ६० लाख ५९ हजार ६८७ शेतकऱ्यांनी हे कार्ड काढलेले असून यांपैकी महाराष्ट्रातील ३९ लाख ४९ हजार १४४ शेतकऱ्यांनी या कार्डचा लाभ घेतलेला आहे.
पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसायासाठी दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज ( Loan) उपलब्ध होईल तसेच केसीसी (KCC) कार्ड धारकांना ३ लाख रुपये कर्जाची मर्यादा आहे. अर्ज स्वीकारल्यानंतर बँक व्यवस्थापनाला १५ दिवसांच्या आत केसीसी तयार करावे लागणार असून यासाठी कोणतेही शुल्क आकारता येणार नाही. अर्ज दाखल लाभार्थ्यांच्या हातामध्ये येऊ पर्यंतची सर्व जबाबदारी बँकेची असेल.

हे ही वाचा (Read This) शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत मिळणार ८०% टक्क्यापर्यंत अनुदान – कृषिमंत्री भुसे.

आवश्यक असणारे कागदपत्रे
१. बॅंकेतून घेतलेला अर्ज पूर्ण, नीट भरावा लागेल.
२. ओळख प्रमाणपत्र (मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड यापैकी कोणतेही)
३. इतर कोणत्याही बँकेत कर्जदार नाहीत असे प्रतिज्ञापत्र (NO Dues)
४. अर्जदाराचा पासपोर्ट साइझ फोटो

पात्रता
१. सामूहिक शेती करणारे तसेच वैयक्तिक शेती करणारे शेतकरी
२. बचत गटाच्या माध्यमातून शेती करणारे शेतकरी
३. बटईने शेती करणारे शेतकरी.

व्याज किती अदा करावा लागेल ?
किसान क्रेडिट कार्डवर घेतलेल्या किमतीवर ९ % व्याज दर असून सरकार २ % सवलत देते. तसेच जो व्यक्ती वेळेवर रकम परत करतो त्यास ३ % सूट मिळत असते. म्हणजेच एकंदरीत शेतकऱ्यांना ४ % व्याज अदा करावे लागते.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *