योजना शेतकऱ्यांसाठी

शेतकऱ्यांना मिळणार १५ लाख, या योजनेचा लाभ घ्या !

Shares

शासन शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक विविध योजना, अनुदान, उपक्रम राबवत असतो. आता सरकारने पीएम किसान एफपीओ (FPO) योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नवीन शेती व्यवसाय सुरु करण्यासाठी १५ लाख रुपये देण्याचे ठरवले आहे. एफपीओ (FPO) ही शेतकरी उत्पादक संस्था असून ही संस्था शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करते. एफपीओ (FPO) कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत आहे. आपण आज या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

पीएम किसान एफपीओ योजनेच्या मुख्य बाबी
१. या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रक्रिया, सिंचन, तांत्रिक, सिंचन आदी सुविधा पुरविल्या जातात.
२. या संस्थेमार्फत शेतकऱ्यांना बियाणे, खते, प्रशिक्षण, यंत्र सामग्री तसेच आर्थिक मदत आदी सुविधा देखील पुरविल्या जातात.
३. या योजनेअंतर्गत शेतकरी १५ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतो.
४. शेतकऱ्यांना सर्व प्रकारे मदत करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम ही संस्था करते.

पीएम किसान एफपीओ योजनेसाठीची पात्रता
१. अर्ज कारण्यासाठी अर्जदाराचा व्यवसाय शेती असायला हवा.
२. अर्जदार भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे.
३. मैदानी भागातील किमान एफपीओ चे ३०० सदस्य हवे आहेत.
४. डोंगराळ भागातील एफपीओ चे किमान १०० सदस्य असावेत.
५. स्वतःची लागवड योग्य जमीन साने गरजेचे असून समूहाचा भाग असणे अनिवार्य आहे.

हे ही वाचा (Read This ) या राज्यातील शेतकऱ्यांना ‘२४ तास वीज मोफत’.

आवश्यक कागदपत्रे
१. आधार कार्ड
२. पत्याचा पुरावा
३. जमिनीची कागदपत्रे
४. शिधापत्रिका
५. उत्पन्न प्रमाणपत्र
६. बँक खाते विवरण
७. पासपोर्ट साईज फोटो

अर्ज करण्याची प्रक्रिया
पीएम किसान एफपीओ योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला राष्ट्रीय कृषी बाजाराच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागेल.
१. राष्ट्रीय कृषी बाजाराच्या अधिकृत संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला FPO नावाचा पर्यंत दिसेल.
२. त्या पर्यायावर गेल्यानंतर तुमच्या समोर नोंदणी फॉर्म उघडेल.
३. त्यानंतर तुम्हाला सर्व फील्ड मध्ये विचारण्यात आलेली माहिती भरून सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे.
४. तुम्हाला त्यानंतर एक पासवर्ड सेट करावा लागेल.
५. तुम्हाला कोणतीही अडचण येत असेल तर तुम्ही संकेतस्थळावर दिलेल्या क्रमांकावर फोन करू शकता.

अधिकृत वेबसाइट

https://enam.gov.in/web/fpo

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *