सोयाबीन सह कापसाच्याही दरात मोठी वाढ
कित्तेक दिवसानंतर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या आनंदाचे कारण कापूस (Cotton) असून कापसाला आता चांगला विक्रमी भाव (Record Break Price) मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनमुळे शेतकरी त्रस्त ( Farmer Frustrated ) झाला होता. आता मात्र सोयाबीन (Soybean) शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कृषी उत्पन्न बाजार (Market) समितीमध्ये अधिक प्रमाणात कापसाची आवक वाढली आहे. सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला उचांक असा दर मिळाला आहे. कापसाच्या ९९०० या दराने जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक केला आहे. तर गुजरात ( Gujrat) मध्ये चक्क १० हजार ७५५ कापसाला भाव (Rate) मिळत आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन प्रमाणे कापसाचीही साठवणूक करून टप्प्याटप्प्याने त्याची आवक सुरु होती. त्यानंतर दरात सतत घसरण होत असून काही काळाने दरात स्थिरता निर्माण झाली होती. आता मात्र कापूस तसेच सोयाबीन दराला तेजी येत आहे. या दरात अधिक वाढ होण्याची शक्यता टाळता येत नाही. अनेकांनी तर हा दर १० ते १२ हजारांवर जाणार असल्याचे सांगितले आहे.
हे ही वाचा (Read This ) किसान कार्डसाठी शेवटची तारीख १५ फेब्रुवारी
सोयाबीन आणि कापसाचे दर
सोयाबीन भावात अधिक प्रमाणात घसरण झली होती तेव्हा शेतकऱ्यांनी आवक कमी केली होती. आता दरात वाढ झाल्यामुळे आवक देखील वाढली आहे. चांगल्या सोयाबीनला काही ठिकाणी ६ हजार ७०० दर मिळत आहे तर काही ठिकाणी तर ७ हजार ५०० असा दर मिळत आहे. सेलू येथील कृषी उत्पन्न बाजारपेठेत तर ४ दिवसात कापसाच्या दरात ८०० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी आता आनंदी दिसत आहे. अनेक खासगी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या सोयाबीनला कमी भाव देऊन साठवणूक करून ठेवली होती. आता त्यांना देखील या भाव वाढीचा फायदा होतांना दिसत आहे.