बैलगाडा शर्यती रद्द ?
१६ डिसेंबरला सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीवर ( Bullock Cart Racing ) बंदी उठवण्याचा महत्वाचा निर्णय घेतला होता. राज्यात बैलगाडी शर्यतीला सशर्त परवानगी देण्यात आली असून या निर्णयामुळे अनेक शेतकरी आनंदात होते. मात्र आता वाढत्या कोरोनापासून नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी पुणे (Pune) जिल्ह्यातील आंबेगाव , मावळ तालुक्यातील बैलगाडा शर्यत रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली होती. त्यानंतर बैलगाडा शर्यत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली असून या निर्णयावर माजी खासदार शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी थोडी नाराजी व्यक्त केली आहे.
हे ही वाचा (Read This Also) सर्वाधिक अंडे मिळवून देते कोंबडीची ही जात !
महाविकास आघाडीने केला निर्णयाला केला विरोध
माजी खासदार शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नाराजी व्यक्त करत यांच्या उपस्थितीत बैलगाडा शर्यत रद्द निर्णयाचा निषेध करत घोषणा देण्यात आल्या आहेत. आज होणारी बैलगाडी शर्यत अगदी ऐन वेळेवर रद्द केल्यामुळे आढळराव पाटील यांनी थोड्या काळासाठी आंदोलन केले असून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या.
बैलगाडा शर्यत रद्द करण्याचा निर्णय का घेण्यात आला ?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली होती. त्यानंतर बैलगाडा शर्यत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागिरकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून लवकरच कोरोना संकटाला आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. बैलगाडा शर्यतीबाबतचे पुढील आदेश येईपर्यंत शर्यत स्थगित ठेवण्याचे जिल्हाधिकारी देहमुख यांनी आदेश दिला आहे.