सोयाबीन प्रमाणे झाली कापसाची गत !
यंदा जवळजवळ सर्वच पिकांचे उत्पादन कमी झालेले असून पिकांच्या दरात कधी चढउतार तर कधी स्थिरता येत आहे. त्यात मागील काही दिवसांपासून सोयाबीनची चर्चा जोरदार सुरु आहे. याचे कारण देखील असेच आहे. सोयाबीन पिकास अपेक्षेप्रमाणे दर मिळाले नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली होती. या साठवणुकीचा काही प्रमाणात फायदा शेतकऱ्यांना झाला होता. असेच काही कापसाबाबत झाले आहे. शेतमालाच्या उत्पादनापेक्षा शेतमालाच्या किमतीवर सर्व गोष्टी अवलंबून आहेत. कापसाला सुरवातीला दर थोडा चांगला होता. मात्र दिवसेंदिवस कापूस दरात घट होतांना दिसून येत आहे. त्यामुळे मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांनी कापूस साठवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठवाड्यात काय आहे कापसाच्या दराची स्थिती ?
यावेळेस मराठवाड्यात काय तर संपूर्ण राज्यातच कापसाच्या क्षेत्रात घट झाली आहे. सुरवातीला कापसास प्रति क्विंटल १० हजार रुपये प्रमाणे दर होता. त्यांनतर आवक वाढली तरी कापसाचा दर कायम होता. त्यामुळे शेतकरी थोडा समाधानी होता. परंतु त्यांच्या समाधानाला नजर लागायला वेळ नाही लागला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत झालेल्या बदलाचा परिणाम आता सरळ स्थानिक बाजारपेठेवर होतांना निदर्शनात येत आहे. कारण कापसाच्या दरात २ हजार रुपयांनी घट झाली असून दर प्रति क्विंटल ८ हजार रुपये झाला आहे.
व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट ?
कापसाच्या घटत्या दराचा फायदा खासगी व्यापाऱ्यांनी घेतला आहे असे म्हणता येईल. कापूस हंगामाच्या सुरुवातीला व्यापारी शेतकऱ्यांच्या दारी जाऊन कापूस खरेदी करत होता. परंतु आता कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कापूस मागणीत लक्षणीय घट झाली आहे. त्याच बरोबर कापसाच्या दरात देखील घट झाली आहे. त्यामुळे खासगी व्यापारी अगदीच कवडीमोल भावात कापसाची खरेदी करत आहे.
कापसाच्या दर वाढीमुळे शेतकऱ्यांनी काय घेतला निर्णय ?
पूर्वी मराठवाड्यात कापसाला प्रति क्विंटल १० हजार रुपये दर होता तर आता ८ हजार रुपये प्रति क्विंटल असा दर आहे. शेतकऱ्यांनी नेमके काय करावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. सोयाबीनच्या साठवणुकीनंतर सोयाबीनच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे कापूस उत्पादकांनी देखील कापूस साठवणुकीचा निर्णय घेतला आहे.
वाचा हे देखील