शेतकऱ्यांना मिळणार आधारकार्डावर कर्ज ?
आधार कार्ड आता सगळीकडे अत्यंत महत्वाचे झाले आहे. आधारकार्ड बाबत अनेक बातम्या आपण टीव्ही , पेपर मध्ये पाहत असतो. अश्याच एका बातमीची चर्चा सध्या सगळीकडे होतांना दिसत आहे. केंद सरकार आता आधार कार्ड वर कर्ज देणार आहे असे मेसेज तुम्हाला येत असेल तर सावधान !
काय आहे तो संदेश ?
सध्या व्हाट्स ऍप वर तसेच इतर सोशल साईट्सवर सरकार पीएम योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन टक्के व्याज दराने कर्ज देत आहे त्याचबरोबर ५०% सूट देखील देण्यात येणार आहे. असा संदेश फॉवर्ड केला जात आहे. परंतु हा संदेश खोटा आहे.
असा संदेश आल्यावर काय करावे ?
जर तुम्हाला आधार कार्ड वर २ टक्के व्याजाने कर्ज भेटणार आहे तससह ५० टक्के सूट मिळणार आहे असा संदेश आला असेल तर आताच सावध व्हा. असा संदेश पुढे फॉवर्ड करू नका. जर तुम्ही असा खोटा संदेश फॉरवड केला तर तुमच्यावर सायबर गुन्हा दाखल होऊ शकतो. तसेच तुम्ही वैयक्तिक माहिती कोणालाही सांगू नका. तुमची खासगी माहिती तुमचे बँक खाते रिकामे करू शकते.
तुम्ही कोणत्याही अफवांच्या बळी पडू नये. तसेच असा काही संदेश तुम्हाला आला असेल तर पुढे कोणालाही फॉरवर्ड करू नये. अन्यथा तुमच्या वर सायबर गुन्हा दाखल होऊ शकतो.
वाचा हे देखील