हापूस आंब्याचे बाजारात आगमन !
यावेळेस अतिवृष्टी , अवकाळी मुळे फळे, पालेभाज्या, कडधान्य पिकांचे मोठ्या संख्येने नुकसान झाले आहे. जवळ जवळ सर्वच शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. सर्वाधिक फटका हा फळबागायतदारांना बसला आहे. आंबा बागेची तर मोठ्या संख्येने हानी झाली आहे. आंबा पिकावर करपा रोगाची लागण झाली आहे. या वेळेस आंबा उत्पादनात मोठी घट झाली असून आंबा काढणीस उशीर झाला आहे. आता मात्र फळांचा राजा असलेला हापूस आंबा बाजारात आगमन करत आहे. वाशीच्या बाजारपेठेत हापूस आंब्याची एंट्री झाली आहे. हापूस आंब्याची आवक ही फेब्रुवारी महिन्यात सुरु होत असते. मात्र यंदा काही दिवसांपूर्वीच हापूस आंब्याचे आगमन झाले आहे. आंब्याचे वेळेपूर्वी आगमन झाले असले तरी उत्पादनात जास्त घट होण्याची शक्यता दिसून येत आहे. हापूस आंब्याची खरी अवाक ही मार्च – एप्रिल महिन्यात होत असते. मात्र यावेळेस लवकर आगमन झाल्यामुळे आंबा चाहत्यांनी बाजारात आतापासूनच गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. कोकणमधून हापूस आंबे बऱ्याच संख्येने वाशी बाजारपेठेत पाठवले आहेत. बदलत्या वातावरणामुळे पुढे आंब्याचे किती उत्पादन होईल हे सांगता येत नाही.
आंब्याचे दर काय ?
वेळेआधीच आंब्याचे आगमन झाल्यामुळे दरात जास्त काही बदल दिसून येत नाहीये. हापूस आंब्याचे आगमन लवकर झाल्यामुळे सगळीकडे हापूस आंब्याची चर्चा रंगात आली आहे. हापूस आंब्यास प्रति पेटी २ हजार ते ५ हजार पर्यंत दर मिळणार असे दिसून येत आहे.
आंब्याच्या पेट्यांचे बाजारात आगमन झाले असले तरी आंब्याचे सीजन सुरु होण्यासाठी अजूनही वेळ आहे.तरीही आंबा चाहत्यांनी बाजारात आंबा खरेदीसाठी गर्दी केली आहे.