ओमिक्रॉन चा फळबागेवर मोठा फटका !
सध्या पालेभाज्यांपासून अन्नध्यानांपर्यंत सर्वांचेच दर घसरले आहे. त्यात फळांचे दर कधी स्थिर तर कधी चढउतार करत आहेत. केळीचे दर देखील घसरत चालले आहे त्यामुळे केळीचे उत्पादन घ्यावे की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. आता पर्यंत अनेक नैसर्गिक संकटे एकालागोपाठ येत होती यात आता दुष्काळात तेरावा महिना प्रमाणे ओमिक्रॉनने आगमन केले. या ओमिक्रॉनमुळे केळीचे उत्पादन नकोच असे शेतकऱ्यांना झाले आहे. त्यामुळे भविष्यात केळीची कमतरता भासणार आहे असे चित्र आतापासूनच दिसत आहे.
काय आहे सध्या केलीच दर ?
सध्या केळीस फक्त ३ हजार रुपये प्रति टन असा दर आहे. केळी पिकाच्या लागवडीपेक्षा कमी खर्चात केळी विकली जात आहे. त्यामुळे भविष्यात नुकसान होऊ नये यासाठी शेतकरी केळी पीक घ्यावे की नाही या प्रश्नात पडला असून तो पीक पद्धतीमध्ये बदल करत आहे.
केळी रोपास कितपत मागणी ?
सध्याची केळीची परिस्थिती पाहता केळी पिकाच्या रोपास मागणी नाही च्या बरोबरीने आहे. केळीचे दर पाहता शेतकरी कोणत्याही प्रकारचा धोका घेत नाहीये. यामुळे अनेकांना केळीची रोपे अशीच फेकून द्यावी लागत आहे. हंगामाच्या सुरुवातीपासूनच केळी फळास अपेक्षेनुसार दर मिळालेला नाही. लॅब चालकांनी तर शेतकऱ्यांना रोपे फुकट घेऊन जा असे म्हंटले आहे. तरीही शेतकरी केळी लागवड न करण्यावर ठाम आहे. राज्यातील ३५ लॅब पैकी ७ लॅब बंद पडल्या आहेत.
शेतकऱ्यांच्या नियोजन ठरले चुकीचे ?
महाराष्ट्रातील पश्चिम भागात नवीन क्षेत्रावर केळी लागवड करण्याचे शेतकऱ्यांनी नियोजन केले होते. परंतु केळीची बाजारपेठेमधील अवस्था तसेच ओमिक्रॉनचा दिवसेंदिवस वाढत प्रादुर्भाव पाहता शेतकऱ्यांनी त्यांचे नियोजन बदलले आहे. केळी लागवडीसाठीं लाखों रुपये खर्च केले मात्र त्यास अपेक्षेप्रमाणे दर मिळाले नाही. ओमिक्रॉन केळीचे दर वाढू देईल का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.