सोयाबीन दरात स्थिरता मात्र आवकामधे चढ उतार
सॊयबीनच्या बाबतीत कोणताही अंदाज करणे अत्यंत अवघड झाले आहे. सोयाबीनच्या दरात घसरण होत असतांना देखील केंद्र सरकारने वायद्यांवर बंदी घातली आहे. याचा परिणाम थेट सोयाबीन दरावर होतांना दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेले सोयाबीन अतिशय संयमपणे विक्रीस काढले आहे. सोयाबीनचे दर हे चढउतार करत एका जागी येऊन थांबले आहे.शेतकरीवर्ग विक्री करावी की नाही या संकोचात असलेला बघायला मिळत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये आणि त्यांना फायदा करून घेता यावा यासाठी त्यांनी स्वतःच्या नियोजनानुसार टप्या-टप्याने विक्री करण्याचा सल्ला कृषितज्ज्ञ देत आहेत. अस्थिर असणाऱ्या सोयाबीनच्या बाजारात मागील काळात सोयपेंड आयातीची चर्चा सुरु होती अस असतानासुद्धा सोयाबीनच्या दरात वाढ होत होती.बाजारपेठेत दर कमी तर आवक जास्त प्रमाणात होत होती. गेल्या ३ आठवड्यांपासून सोयाबीनचे दर आहे ६ हजारावर टिकून आहे. सोयाबीन आवक कमी जास्त होत आहे तरीही दर मात्र स्थिरच आहेत. त्यामुळे नेमके करावे काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
सोयाबीन विक्रीवर भर दिला जात आहे?
कधी तरी दर वाढेल या अपेक्षेनं आता पर्यंत शेतकरी सोयाबीन दराची चिंता न करता सोयाबीन साठवणुकीवर भर देत होता. कारण उत्पादन कमी झाल्यामुळे दरात वाढ होईल असा विश्वास शेतकऱ्यांना होता. परंतु सोयाबीन दरात वाढ होतांना दिसून नाही आली तसेच सरकारने त्यांचा निर्णय देखील दिला नाही त्यामुळे सोयाबीन टप्प्याटप्प्याने विक्रीस काढले आहे. खऱ्या अर्थाने दिवाळीनंतरच सोयाबीनच्या दरात वाढ झालेली आहे. ते ही योग्य दर मिळाल्याशिवाय सोयाबीनची विक्री करायची नाही ही भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. दरम्यानच्या काळात मागणी अधिक आणि पुरवठा कमी असल्याने ४ हजार ५०० वरील दर थेट ६ हजार ६०० पर्यंत गेले होते. मात्र, त्यानंतर सोयापेंड आयातीची चर्चा आणि आता केंद्र सरकारने वायदे विक्रीवर घातलेली बंदी यामुळे दरात मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. गेल्या तीन आठवड्यात ६०० रुपयांची घसरण झाली आहे. शिवाय आता मार्केटमध्ये उठावच नसल्याने सोयाबीनची विक्री करावी का साठवणूक हा मोठा प्रश्न आहे. आता मात्र सोयाबीनची आवक वाढली आहे.त्यामुकले सोयाबीन विक्री ही अजूनही टप्याटप्याने करावी असे अशोक अग्रवाल यांनी सल्ला दिला आहे.