तुमचे शिक्षण कमी आहे , रोजगाराच्या शोधात आहात तर या योजना खास तुमच्यासाठी आहे
अनेकांचे काही कारणाअभावी शिक्षण पूर्ण होऊ शकत नाही. अपूर्ण शिक्षण घेतल्यामुळे नौकरी मिळते अतिशय अवघड असते. व्यवसायात देखील याचा काही प्रमाणात परिणाम होतो. तर अनेकांना तर रोजगाराची संधी उपलब्धच होत नाही.यामुळे केंद्र सरकारने विविध योजना राबवल्या आहेत. या योजनेअंतर्गत आठवी ते बारावी उत्तीर्ण झालेल्या नागरिकांना रोजगार उपलब्ध करून दिले जाते. अश्या काही योजनांची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.
दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना –
१. ही योजना ग्रामीण भागातील युवकांसाठी आहे.
२. या योजनेअंतर्गत युवकांना वेगवेगळ्या क्षेत्रातील कौशल्याचे शिक्षण दिले जाते.
३. युवकांना स्वयंरोजगारासाठी तयार केले जाते.
पीएम स्वनिधी योजना –
१. पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत तुम्ही स्वतःचा स्वयंरोजगार उभारू शकता.
२. या योजनेअंतर्गत १० हजार रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येते.
३. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे.
मनरेगा योजना –
१. मनरेगा योजना अंतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्षी १०० दिवसांचा रोजगार दिला जाण्याची हमी असते.
२. या योजनेसाठी अर्ज केल्यानंतर १५ दिवसांमध्ये तुम्हाला रोजगार मिळू शकतो.
पीएम कौशल्य विकास योजना –
१. पीएम कौशल्य विकास योजने अंतर्गत कौशल्य विकासाचे पूर्ण शिक्षण दिले जाते.
२. तुम्ही घेतलेल्या प्रशिक्षणाच्या संबंधित व्यवसाय तुम्ही सुरु करू शकता.
३. व्यवसाय सुरु कार्यच नसेल तर प्रशिक्षणाच्या संबंधित रोजगार मिळवू शकता.
पीएम रोजगार सृजन कार्यक्रम –
१. पीएम रोजगार सृजन कार्यक्रम अंतर्गत स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी सरकारकडून १० लाख रुपये कर्ज दिले जाते.
२. या योजनेंतर्गत व्यापारी सेवा क्षेत्रात काम करण्यासाठी ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येते.
३. यासाठी उमेदवार किमान आठवी उत्तीर्ण असला पाहिजे.
तुमचे शिक्षण आठवी पर्यंत झाले असेल आणि तुम्ही रोजगाराच्या शोधात असला तर वरील योजनांचा तुम्ही लाभ घेऊ शकता.