पिकपाणी

खतांच्या दरात वाढ शेतकऱ्यांवर परिणाम ?

Shares

या वर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठ्या संख्येने नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामी पिकांकडून अनेक अपेक्षा आहेत. खरीप हंगामात पडलेल्या पावसानंतर शेतकरी पूर्णतः हतबल झाला होता. त्यात नेमक्या रब्बी पिकांच्या पेरणीच्या वेळेस अवकाळी पाऊस पडला होता. त्यामुळे पिकांवर रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे असे म्हणता येईल की अस्मानी संकटाच्या लागोपाठच सुलतानी संकट आले.
आता नुकतीच आलेल्या एका बातमीची चर्चा सगळीकडे सुरू आहे. ती बातमी म्हणजे खतांच्या दरात वाढ झाली आहे. नुसती वाढ नाही तर तब्बल ४९० रुपयांनी वाढ झाली आहे. शेतकरी रब्बी हंगामात पडलेल्या थंडीमुळे थोडा आनंदी झाला होता. आता मात्र त्यांच्या आनंदाला विरजण लागले आहे. या दर वाढी नंतर अनेक शेतकरी तसेच शेतकरी संघटनांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी तर त्यांचा तीव्र संताप व्यक्त केला आहे.

दरवाढ होण्यामागील नेमके कारण काय ?
आधीच शेतकरी मोठ्या संकटातून जात होता. शेतकऱ्यांच्या हातात अगदी नाहीच्या बरोबरीने पीक उत्पादन आले आहे. त्यात आता खतांचे दर वाढले आहेत. त्यामुळे शेतकरी तर पुन्हा संकटात सापडला आहे. उत्पादनांत घट झाल्यामुळे कच्च्या मालाचे दर वाढले आहेत यामुळे खतांच्या दरात देखील वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारठेत खत तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची किंमत वाढली आहे. त्याच्या परणिणामी खतांमध्ये वाढ करण्यात आली आहे. असे सरकारकडून सांगण्यात येत आहे.

उत्पादनात घट होण्याची कारण बनू शकते खतांचे दर ?
रब्बी हंगामात पिकांना खत देण्याची गरज असते. त्यात बदलत्या वातावरणामुळे पिकास खत देणे अगदीच आवश्यक झाले आहे. अश्यात खतांमध्ये दर वाढ झाल्यास आम्ही काय करावे? असा प्रश्न शेतकऱ्यांनी केला आहे. हा खतांचा वाढता दर शेतकऱ्यांच्या उत्पादनात अडथळा निर्माण करून उत्पादन घटण्याचे कारण बनणार आहे.
रासायनिक खतांमध्ये युरिया , डीएपी वगळता सर्व खतांमध्ये दर वाढ करण्यात आली आहे. यावर शेतकऱ्यांनी आम्ही शेती करावी तरी का ? असा प्रश्न निर्माण केला आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *