सोयाबीन साठवलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी !
गेल्या काही दिवसांपासून सोयाबीन आयातीवर अनेक प्रश्न निर्माण होत होते. सोया पेंड आयातीबाबतचा कोणताही प्रस्ताव केंद्र सरकारकडे नाही, असे वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी जाहीर केले. जून – जुलै २०२१ मध्ये सोयाबीनचा भाव हा ११ हजार प्रति क्विंटल पर्यंत गेला होता. पोल्ट्री फार्म उद्योगात सोयाबीन पेंडचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. सोयाबीनच्या या भावामुळे पोल्ट्री उद्योग देखील संकटात सापडले होते. या भाव वाढीमुळे सोयापेंड आयात करावेत अशी मागणी पोल्ट्री उद्योगांनी मागणी केली होती. या मागणीमुळे मुख्य सोयाबीन हंगामात १२ लाख टन सोयापेंड आयात करणार आहे असे सांगितले जात होते. यावर विरोध म्हणून शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याचा इशारा केंद्र सरकारला दिला होता. शेतकऱ्यांनी दबाव निर्माण केल्यानंतर सोयपेंड आयातीचा आमचा कसलाही प्रस्ताव नाही असे जाहीर करण्यात आले.
सोयाबीनच्या आयात चर्चेदरम्यान सोयाबीनचे दर ४ हजार ते ५ हजारावर आले होते. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला होता. सोयाबीनचे दर लवकरच वाढतील अशी शक्यता व्यक्त केल्यानंतर शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवून ठेवला होता. सध्या सोयाबीनचा भाव ७ हजारापर्यंत गेला आहे. सोयाबीनचा भाव हा अजून १० हजारांपर्यंत जाण्याचा अंदाज दर्शवला जात आहे.