३७८ दिवसांनी शेतकरी आंदोलनाला पूर्णविराम.
कृषिकायदे रद्द व्हावे यासाठी शेतकरी गेल्या कित्तेक दिवसांपासून आंदोलन करत होते. शेतकऱ्यांनी एमएसपी चा कायदा आणि गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती. अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांची केंद्र सरकारसोबत चर्चा सुरु होती. आता शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करत असलेले संयुक्त किसान मोर्चाने गुरुवारी आंदोलन संपेल अशी घोषणा केली. ११ डिसेंबर पासून सर्व शेतकरी आंदोलन केलेले ठिकाण रिकामे करण्यास सुरुवात करतील. त्यांनी सांगितले केंद्र सरकारने जर दिलेली आश्वासने पूर्ण नाही केलीत तर आम्ही पुन्हा आंदोलन सुरु करू. त्याचबरोबर आंदोलनादरम्यान काही शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले होते ते देखील मागे घेतले जातील.
११ डिसेंबर ला शेतकरी आनंद साजरा करण्यासाठी मिरवणूक काढणार असून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शांततेच्या मार्गाने करण्यात आलेलं शेतकऱ्यांचं सर्वात मोठं आंदोलन होतं असे शेतकऱ्यांनी म्हंटले आहे.