अतिवृष्टीमुळे द्राक्ष बागांचं १० हजार कोटींचे नुकसान !
अजूनही अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरून निघाले नाही की अवकाळी बदलत्या हवामानामुळे फळबागेचे झालेले नुकसान भरून निघण्यासारखे नाही. द्राक्षाचे काढणीला आलेल्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जवळपास १० हजार कोटींचे नुकसान झाले आहे. १० ते १२ दिवसांपूर्वी द्राक्ष बाग अंतिम टप्प्यात म्हणजेच फुलोरावस्थेत होते . अचानक वातावरणात बदल झाला त्यामुळे या पिकाची फळगळती , फळकूज होऊन शेतकऱ्यांसमोर नवीन समस्या निर्माण झाली आहे. बाकी उरलेल्या पिकावर भुरी, डाऊनी सारख्या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. साधारणतः दरवर्षी सरासरी प्रति एकरी १२ टन उत्पादन मिळत असून प्रति किलो ४० रुपये प्रमाणे भाव मिळत असून ५ लाखांचे उत्पन्न शेतकऱ्यांच्या पदरी पडत असते. यावेळेस अगदीच निम्मे उत्पन्न शेतकऱ्यांच्या पदरी पडणार आहेत.
शासन संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी कर्जाचे धोरण बदलेल का ? वीजबिल माफ करेल का? काही काळ कर्ज वसुली थांबवून शेतकऱ्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी नवीन उपाययोजना राबवल्या जातील का? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडले आहे.