मिरचीच्या भरगोस उत्पादांसाठी अनुकूल हवामान, जमीन!
भारतामध्ये मिरचीचा वापर मोठ्या संख्येने केला जातो. मिरचीची लागवड योग्य हवामानात चांगल्या पद्धतीने केल्यास उत्पादन जास्त मिळते. तीनही हंगामात मिरची पिकाची लागवड करता येते. उष्ण व दमट हवामानात या पिकाची वाढ उत्तम होते. या पिकाच्या जास्त उत्पादनासाठी त्याची काळजी घेणे महत्वाचे ठरते. आपण मिरची पिकासाठी कसे हवामान अनुकूल ठरते याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
१. जर पावसाळी वातावरण असेल तर फुलांची गळती जास्त प्रमाणत होण्याची शक्यता असते.
२. पावसाळी ढगाळ वातावरणात पाने फुले कुजतात.
३. मिरची फळाच्या उत्तम वाढीसाठी २५ ते ३० से. तापमान उत्तम ठरते.
४. तापमानात तफावत झाल्यास फुलांबरोबर फळांचीही गळती होते.
५. या पिकाच्या बियांची उगवण १८ ते २७ से. तापमानात उत्तम होते.
६. या पिकाच्या लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा करणारी जमिनीची निवड करावीत.
७. मध्यम ते भारी जमिनीमध्ये या पिकाची वाढ चांगली होते.
८. हलक्या जमिनीत हे पिक घ्यायचे असल्यास योग्य सेंद्रिय खतांचा वापर करावा लागतो.
९. निचरा न होणाऱ्या जमिनीत मिरची पिकाची लागवड करू नये.
मिरची च्या उत्तम वाढीसाठी , जास्त उत्पादनासाठी योग्य हवामान,जमिनीची निवड केली पाहिजे.