भारत मुळस्थान असणारी काकडी लागवड
काकडीचे मुळस्थान भारत आहे. त्यामुळे भारतात काकडीच्या अनेक जातींची लागवड केली जाते. महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात या पिकाची लागवड केली जाते. काकडी पीक आंतरपीक म्हणून देखील घेतले जाते. उन्हाळी हंगामात पुणेरी खीरा , हिमांगी काकडी घेतली जाते. महाराष्ट्रात खरीप हंगामात काकडीचे पीक घेतले जाते. काकडी पिकाची बाजारात बाराही महिने मागणी असते. काकडीचा उपयोग औषधांमध्ये देखील होतो. जाणून घेऊयात काकडी लागवडीची संपूर्ण माहिती.
जमीन व हवामान –
१. मध्यम ते रेताड जमिनीत काकडीचे पीक घेता येते.
२. जमिनीचा सामू ५.५ ते ६.७ दरम्यान असावा.
३. उन्हाळी व पावसाळी हंगामात काकडीचे जास्त उत्पादन मिळते.
४. थोड्याच ठिकाणी रब्बी हंगामात पुणेरी खीरा व हिमांगी पीक घेतले जाते.
५. काकडीस उष्ण हवामान जास्त मानवते.
लागवड व पाणी व्यवस्थापन –
१. जुन्या मुरलेल्या जमिनीत काकडीची वाढ उत्तम होते.
२. सरी वरंबा पद्धतीने काकडी लागवड केली जाते.
३. काकडी लागवडीस हेक्टरी २.५ किलो बियाणे लागते.
४. या पिकास हेक्टरी पालाश ६० किलो, स्फुरद ६० किलो, नत्र १६० किलो द्यावे लागते.
५. उन्हाळी हंगामात काकडी पिकास नियमीत पाणी देणे गरजेचे आहे.
६. काकडी पिकास फुले आल्यानंतर पाणी देणे चुकवू नये.
आंतरमशागत –
१. आंतरमशागत करतांना तण विरहित ठेवणे गरजेचे आहे.
२. पाऊस पडल्यानंतर वेलीची मुळे उघडी पडली असल्यास त्यास मातीची भर द्यावी.
३. फळे येण्यापूर्वी मातीचा फळांशी संपर्क टाळण्यासाठी गव्हाचे काड , सालीचे तणस फळाच्या खाली ठेवाव्यात. जेणेकरून फळे कुजण्याची प्रमाण कमी होईल.
काढणी –
१. काकडीची फळे कोवळी असतांना काढावीत जेणेकरून बाजारात चांगला भाव येईल.
२. काकडीची तोडणी २ ते ३ दिवसांनी करावीत.
उत्पादन –
काकडीचे जाती व हंगामानुसार हेक्टरी २०० ते ३०० क्विंटल पर्यंत उत्पादन होते.
काकडीची मागणी बाजारात मोठ्या संख्येने असून त्यास चांगला भाव मिळतो त्यामुळे काकडीचे उत्पादन घेणे फायदेशीर ठरते.