एकदाच करा निशिगंधा लागवड ,३ वर्षापर्यंत कमवा बक्कळ पैसा !
शेतकरी सहसा अश्या पिकाच्या शोधात असतो ज्या पिकातून जास्त काळापर्यंत उत्पन्न मिळवता येईल. अश्याच एका फुलशेतीची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. आर्थिकदृष्ट्या पहिले तर फुलशेती ही परवडणारी आहे. त्यातल्यात्यात निशिगंधा म्हंटले तर विचारायचे कामच नाही. प्रत्येक बाजारपेठेत निशिगंधाची मागणी मोठ्या संख्येने आहे. १० गुंठ्यात या पिकाची लागवड करायची असेल तर अगदी ४ते ५ हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागते. निशिगंधाच्या शेतीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.
लागवड पद्धत –
१. निशिगंधाची एकदा लागवड केली तर साधारणतः ३ वर्षापर्यंत हे पीक एकाच जमिनीवर राहते. त्यामुळे जमिनीची चांगली मशागत करणे गरजेचे असते.
२. लागवड करतांना चांगली निचरा करणारी जमीन निवडावी.
३. बाराही महिने पाण्याची सुविधा असेल तर या पिकाची लागवड कधीची करू शकतो.
४. लागवड करतांना २ पिकांमधील अंतर ३० x ३० ठेवावेत.
खत व्यवस्थापन –
१. लागवड करण्यापूर्वी ३० ग्रॅम वजनाचे कंद कॅब्रेन्डाझीम च्या द्रावणात २० मिनिटे ठेवावेत.
२. लागवडीपूर्वी हेक्टरी ४० ते ५० टन शेणखत जमिनीत मिसळावेत.
३. हेक्टरी १५० किलो स्फुरद , २०० किलो नत्र , २०० किलो पालाश तीन हफ्त्यांमध्ये द्यावेत.
काढणी –
१. कंद पूर्णपणे तयार झाल्यांनतर पाने सुकतात. त्यानंतर पाणी देणे थांबवावेत.
२. साधारणतः एका आठवड्यानंतर पाणी देण्यास सुरुवात करावीत.
३. कंद काढतांना त्यास इजा होणार नाही याची दक्षता घ्यावी.
४. कंद काढल्यानंतर लगेचच त्याची लागवड करू नये.
५. कंद काढल्यानंतर १० ते १५ दिवस त्यास उन्हात सुकवावेत.
अश्याप्रकारे जर लागवड करतांना काळजी घेतली तर जास्त उत्पादन मिळेल तसेच या पिकास बाजारात मागणी जास्त आहे. त्यामुळे उत्पन्न चांगले मिळते.