या वनपस्पतीची शेती करून मिळवा लाखोंचे उत्पन्न, सरकार करणार मदत
आज आपण एका लाखोंचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या वनस्पतीची माहिती जाणून घेणार आहोत. ती वनस्पती म्हणजे स्टीव्हिया. ह्या वनस्पतीची लागवड कमी जागेत करता येते. साखरेला पर्याय म्हणून या वनस्पतीचा वापर केला जातो. ही वनस्पती साखरेपेक्षा २५ ते ३० पट गोड आहे. स्टीव्हिया वनस्पतीची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. या वनस्पतीचा व्यवसाय देखील आपण करू शकतो. ही वनस्पती ६० ते ७० सेमी पर्यंत वाढ होते. जगात या पिकाची लागवड कोरिया,जपान, तैवान, अमेरिका मध्ये केली जाते तर भारतामध्ये पुणे, बंगळुरू, रायपूर, इंदूर या शहरांमध्ये केली जाते. या पिकाची लागवड करणे अत्यंत फायद्याचे ठरते. स्टीव्हिया वनस्पतीच्या लागवडीसाठी लागणारा खर्च , उत्पन्न या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.
स्टीव्हिया लागवडीसाठी लागणारा खर्च व मिळणारे उत्पन्न
१. एका एकरात स्टीव्हिया पिकाचे ४०,००० रोपे लावली तर सुमारे १ लाखा रुपयापर्यंत खर्च येतो.
२. या पिकापासून ६ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते.
३. कमी जागेत देखील या पिकाची लागवड करून पाच पटीने जास्त नफा मिळवू शकतो.
स्टीव्हिया वनस्पतीची वाढती मागणी पाहता या पिकाची लागवड करणे फायद्याचे ठरते. एखादया कंपनीशी करार करून त्यांना या पिकाचा पुरवठा करता येतो.