डाळिंब पिकावर फुलाची समस्या का उध्दभवते
डाळिंब पिकासाठी पडीक , माळरानाची जमीन देखील मानवते. डाळिंब पिकासाठी किमान पुढील ५० वर्षे तरी बाजारपेठेत मोठ्या संख्येने मागणी असणार आहे. डाळिंबाच्या साल , पाने , फुले , फळाचा उपयोग औषधी तयार कारण्यासाठी करतात. डाळिंबाचे फळ चांगले येण्यासाठी त्याच्या फुलास जास्त महत्व आहे. फळे किती व कशी येणार हे डाळिंबाच्या फुलावर अवलंबून आहे. त्यामुळे फुलांकडे लक्ष देणे गरजेचे ठरते. फुलांवर विविध समस्या उध्दभवत असतात त्या कोणत्या व का उध्दभवतात हे आपण आज जाणून घेणार आहोत.
डाळिंब फुल समस्या व कारणे –
१. अनेक वेळा झाडास भरपूर फुले लागतात परंतु २ ते ३ दिवसात लगेच गळून पडतात. याचे मुख्य कारण म्हणजे डाळिंब झाडास मुख्य, दुय्यम , सूक्ष्म मूलद्रवे कमी प्रमाणात भेटणे.
२. बहार येत्या वेळेस पाण्याचे अयोग्य नियोजन असल्यास फुले गळतात.
३. दोन बहारामधील अंतर योग्य नसेल तर फुले येत नाहीत.
४. डाळिंब झाडाची छाटणी जास्त किंवा कमी प्रमाणात झाली असल्यास देखील फुले येत नाहीत.
५. जमिनीस पाण्याचे प्रमाणात कमी जास्त दिल्यास फुलांवर दुष्परिणाम होतो.
६. जमिनीचे तापमान वाढले , जास्त ताणानंतर पाणी दिले तर फुले येत नाहीत.
७. डाळिंब झाडाच्या कळी व फुलावर रोगाचा , किडीचा प्रादुर्भाव झाला असल्यास फुले गळतात.
८. डाळिंब बागेत संजीवकाची कमतरता झाल्यास अनेक समस्या उध्दभवतात.
९. पानांची संख्या आवश्यकतेनुसार नसेल तर फुले निघत नाहीत.
डाळिंब लागवड झपाट्याने वाढत आहे. डाळिंबाचे जास्त उत्पादन घेण्यासाठी फुलांची काळजी घेणे गरजेचे आहे.