उपवासामध्ये खाल्ले जाणाऱ्या रताळे ची लागवड
भारतातील एक औषधी वनस्पती म्हणून रताळ्याचा उपयोग होतो. यामध्ये उच्च प्रकारचे तंतू असतात. रताळे तणाव दूर करण्यास मदत करते. भारतामध्ये उपवासामध्ये आवर्जून रताळे खाल्ले जाते. रताळे चवीस थोडे गोड असतात. यास बाजारपेठेत मोठ्या संख्येने मागणी आहे. त्यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनवले जातात. बटाटयाच्या घराण्यातील रताळे लागवड कशी करावी हे जाणून घेऊयात.
जमीन व हवामान –
१. रताळे लागवडीसाठी उतार असेलेली जमीन निवडावी.
२. उत्तम निचरा होणारी जमीन या पिकास चांगली ठरते.
३. टेकडीच्या उतारावर वरकस जमिनीत हे पीक उत्तम येते.
४. याचे पावसाळी पीक घ्यायचे असेल तर याची लागवड जून महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात करावी.
लागवड –
१. या पिकाची लागवड करतांना वेलांच्या शेंड्याकडील व मधल्या भागातील बेण्यांची निवड करावी.
२. साधारणतः बेण्यांची लांबी २० ते ३० सेमी असून त्यावर ३ ते ४ डोळे असावेत.
३. वेलाचे ८०० तुकडे एका गुंठ्यासाठी लागतात.
४. लागवडीच्यावेळेस २५ सेमी अंतरावर बेणे वरंब्यावर लावावेत.
५. बेण्याचा मधला भाग जमिनीत पुरून दोन्ही टोके उघडी ठेवावीत.
६. बेण्याच्या मधल्या भागात असलेले डोळे जमिनीत पुरले जातील याची दक्षता घ्यावी.
७. सऱ्या पाडण्यापूर्वी जमिनीत शेणखत मिसळावेत .
८. लागवड करतांना आवश्यकतेनुसार खतमात्रा द्यावी.
९. लागवड केल्यानंतर ३० ते ४० दिवसानंतर प्रति हेक्टर ४० किलो नत्र द्यावे.
१०. लागवडीनंतर १५ दिवसांनी पहिले बेणणी तर लागवडीनंतर ३० दिवसांनी दुसरी बेणणी करावी.
११. त्याचवेळी वेलांना रासायनिक खतांचा दुसरा हफ्ता द्यावा.
१२. ४५ ते ६० दिवसांच्या दरम्यान शेंड्याकडील भागाचा गुंडाळा करून ठेवावा जेणेकरून जमिनीत टेकलेल्या वेलांच्या डोळ्यातून मुळे फुटणार नाहीत.
काढणी –
१. लागवडीनंतर साडेतीन ते चार महिन्यांनी पाने पिवळी पडायला लागल्यास रताळ्याची काढणी करावी.
२. रताळे तयार झाली आहेत की नाही हे पाहण्यासाठी ३ ते ४ रताळे सुरीने कापून पाहावेत. त्यातून बाहेर आलेला पांढरा चीक वाळल्यानंतर देखील पांढरा राहतो की नाही हे पाहावे.
३. त्या चिकास वाळल्यानंतर हिरवा किंवा काळसर रंग आल्यास रताळे काढण्यास तयार झाले नाही असे समजावेत.
उत्पादन –
रताळ्याचे १५ टन प्रति हेक्टरी पर्यंत उत्पादन मिळते.