ऊस उत्पादन वाढीसाठी काय करावे ? जाणून घ्या या खास गोष्टी !
ऊसाच्या उत्पादनात वाढ करताना पाणी आणि खत वाचवायचं आहे का? तर मग ठिबक सिंचन आणि जोड ओळ पद्धत वापरा. चला, याबद्दल आजच्या व्हिडिओत थोडक्यात माहिती घेऊया!”
-“सुरुवात करा उगवणीच्या काळापासून. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये परंपरागत पद्धतीने १०-१२ दिवसांच्या अंतराने पाणी द्या. मात्र, ऊस वाढीच्या टप्प्यावर ठिबक वापरा. उन्हाळ्यात दररोज आणि हिवाळ्यात एक दिवसाआड पाणी द्या. यामुळे तुमचं पाणी वाचेल आणि पीक हिरवंगार राहील.”
-ठिबकद्वारे ८०% खताची मात्रा पुरेशी आहे. शिफारशीत २५० किलो नत्र :११५किलो स्फुरद :१५५ किलो पालाश प्रति हेक्टरऐवजी २०० किलो नत्र :९२किलो स्फुरद :९२ किलो पालाश प्रति हेक्टर वापरा आणि २५% खत बचत करून उत्पादनात ८.२०% वाढ मिळवा!”
-जोड ओळ पद्धती वापरा. सलग दोन सऱ्यांमध्ये ४५-६० सें.मी. अंतरावर डोळ्यांची लागवड करा आणि नन्तर एक सरी मोकळी सोडा. ही पद्धत केवळ पाण्याचं नियोजन सुलभ करत नाही, तर ऊस लोळण्याची समस्या कमी करून व्यवस्थापन सोपं करते!”
-ठिबक सिंचनामुळे केवळ उत्पादनच वाढत नाही, तर खतांची कार्यक्षमता वाढते आणि पाण्याचा ताळमेळ साधता येतो
अशाच काही माहितीसाठी किसानराज ला subscribe करा.
ऊसासाठी ठिबक सिंचन :
जोड ओळ पध्दत :
१. उगवणीच्या व रोप तयार होण्याच्या काळात परंपरागत पद्धतीने जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात १० ते १२ दिवसांच्या अंतराने सुरू ऊसास पाणी द्यावे.
२. उस पीक वाढीच्या काळात (४० दिवस ते काढणी पर्यंत) ठिबकने (०.८,१.०,१.२ आणि ०.६ ईटीसी) या प्रमाणे ४१- ९०, ९१-१६०, १६०-२५० व २५० ते पक्वतेपर्यंत उन्हाळ्यात दररोज व हिवाळ्यात एक दिवसाआड पाणी द्यावे.
३. ठिबक संचाद्वारे खत दिल्यास शिफारशीत (२५०:११५:१५५ किलो/हे. नत्र, स्फुरद, पालाश) मात्रेच्या फक्त ८० टक्के खताची (२००-९२-९२ कि/हे. नत्र, स्फुरद, पालाश) मात्रा पुरेशी होते.
जोडओळ तयार करण्यासाठी जमिनीचा प्रकार पाहून साधारणतः अडीच ते तीन फुट रुंद सरीवरंबा पद्धत अंमलात आणावी सलग दोन सऱ्यांमध्ये ऊसाची सुमारे ४५ ते ६० सें.मी. वर एक डोळा बेण्याची लागवड करून नंतर एक सरी मोकळी सोडावी म्हणजे लागण केलेल्या दोन सऱ्यांमधील वरंब्यावर उपनळ्या ठेवून पाण्याचे नियोजन करणे शक्य होईल. दोन उपनळ्यांमधील अंतर २.२५ ते २.७० मी. असेल.
उपनळ्यांवरील तोट्यातील अंतर मध्यम ते खोल जमिनीत ६० ते ९० सें.मी. पर्यंत ठेवावे. जोडओळीतील मोकळ्या जागेमधून ऊस दोन्ही बाजूस रेलण्याची शक्यता असते. जेणेकरून लोळण्याची क्रिया कमीत कमी होऊन उपनळीवरील तोट्यांची देखभाल करणे शक्य होते.
ठिबक सिंचन संचातून ऊसासाठी पाण्याबरोबर विद्राव्य खतांचा वापर केला असता खत वापर क्षमता लक्षणीयरित्या वाढून खत मात्रेत बचत होऊन उत्पादनातही वाढ झाल्याचे आढळून आले आहे. ऊसामध्ये ठिबक सिंचनातून खतांचा वापर खालील तक्त्यात दिलेल्या वेळापत्रकानुसार केला असता ऊस उत्पादनात ८.२० टक्के वाढ होऊन खतांच्या मात्रेत २५ टक्के बचत होते.