कडीपत्त्याचे हे गुण जाणून तुम्ही व्हाल थक !
आपण कढीपत्याचा वापर फोडणीत पदार्थाला चव येण्यासाठी करतो. परंतु कढीपत्त्याचे अनेक औषधी गुणधर्म आहेत.सहसा आपण चटण्यांमध्ये , भाज्यांमध्ये , चिवड्यांमध्ये , मसाल्यांमध्ये
कढीपत्त्याच्या वापर करत असतो. तर आपण जाणून घेऊयात कढीपत्त्याचे फायदे.
१. पालक , कोथिंबीर , मेथी पेक्षा जास्त अ जीवनसत्व कढीपत्यामध्ये आढळून येते.
२. कढीपत्त्याच्या शीतल गुणधर्मामुळे जुलाब आणि उलटी यावर कढीपत्त्याचे पाणी उत्तम उपाय ठरतो.
३. पोटात मुरडा येत असेल तर कढीपत्ता चावून खावा.
४. शरीरावरील जखम नीट होत नसेल आणि खास येत असेल तर त्यावर कढीपत्ता चोळून लावावा.
५. विषारी कीटक ने जर दंश मारला असेल तर त्यावर कढीपत्त्याचा लेप लावावा.
६. कढीपत्त्याच्या पानांचा उपयोग रक्तशुद्धीकरणास होतो.
७. कढीपत्ता शरीरातील उष्णता कमी करतो.
८. केस गळती वर , केस गडद आणि दाट होण्यासाठी कढीपत्त्याच्या वापर करतात.
९. कढीपत्यातील फायबर रक्तातील साखर नियंत्रित ठेवते.
१०. तोंडामध्ये फोड येत असेल तर कढीपत्यामध्ये मध मिसळून त्यांची पेस्ट दिवसातून २ ते ३ वेळा लावावी.
११. दररोज कढीपत्ता पाण्यात उकळून पिल्यास वजन कमी होते.
१२. कफ असेल तर कढीपत्त्याच्या पावडर मध्ये मध मिसळून त्याचे चाटण करावे .
१३. कढीपत्त्याच्या दररोजच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल चे प्रमाण कमी होऊन हृदय विकाराचा धोका टळतो.
१४. यकृतासाठी कढीपत्ता उत्तम ठरतो .