योजना शेतकऱ्यांसाठी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी रोपवाटिका योजना २०२०- २१

Shares

महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना फळे आणि भाजीपाला उत्पन्न वाढीसाठी प्रोत्साहन मिळावे आणि फळे व भाजीपाला उत्पन्नात वाढ व्हावी या दृष्टिकोनातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी रोपवाटिका योजना चालू केली आहे.
फळे आणि भाजीपाला मोठ्या प्रमाणात निर्यात देखील केला जातो त्यातून चांगल्या दर्जाची रोपे व भाजीपाला बियांची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्यात कीड व रोगमुक्त रोपवाटिका उभारणीसाठी मागणी आहे. याच उद्देशाने शासनाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना चालू केली आहे यासाठी जास्तीतजास्त शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घेऊन रोपवाटिका उभारली तर आपली शेती नक्कीच समृद्ध होऊ शकते.

योजनेचे उदिष्ट:-
१.भाजीपाला पिकांची दर्जेदार व किडरोग मुक्त रोपे निर्माण करून उत्पन्नात वाढ करणे.
२.रोपवटीकेच्या उभारणीतुन शेतीपूरक व्यवसायाची संधी उपलब्द करून देणे.
३. नवीन तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्यांना फळबागा आणि भाजीपाला उत्पन्न वाढवणे.

योजनेचा विस्तार –
संपूर्ण महाराष्ट्रातील तालुक्यात रोपवाटिक स्थापन करण्याचा मानस शासनाचा आहे.पाचशे शेतकऱ्यांना रोपवाटिका उभारण्याची संधी आहे.

योजनेसाठी अर्ज कोण करू शकतो.?
१. अर्जदारकडे स्वतःच्या मालकीची किमान 0.40 हेक्टर जमीन असणे गरजेचे आहे.
२. रोपवाटिका उभारणीसाठी पाण्याची सोय असावी.

योजनेच्या लाभार्थी निवडचा क्रम –
१. महिला कृषी पदवीधर असेल तर प्रथम प्राधान्य राहील.
२. महिला गट किंवा महिला शेतकरी द्वितीय प्राधान्य राहील.
३. शेतकरी अल्प व अत्यल्प भूधारक असेल तर तृतीय प्राधान्य राहील.

योजनेचा पाठपुरावा-
१. इच्छुक शेतकऱ्यांनी Maha DBT या संकेतस्थळाहुन ऑनलाइन किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे विहित मुदतीत अर्ज करावा.

अर्थसहाय्य स्वरूप आणि Geo tagging करणे.-
१. उपविभागीय कृषी अधिकारी यांच्यामार्फत प्रकल्प उभारणी नंतर प्रथम मोका तपासणी करण्यात यावी, मोका तपासणी प्रमाणे अनुदानाच्या जवळपास 60 टक्के अनुदान प्रथम हप्ता लाभार्थ्यांने आधार लिंक बँक खात्यावर मिळत असतो. मोका तपासणी वेळी RKVP Bhuvan या पोर्टलवर रोपवाटिकेचे Geo tagging करणे गरजेचे आहे.

२. रोपवाटिका रोपांची विक्री किंवा उचल झाल्यावर मंडळ कृषी अधिकारी यांच्यामार्फत व्दितीय मोका तपासणी करणयात येईल, मोका तपासणी प्रमाणे अनुदानाच्या उर्वरित 40 टक्के अनुदान द्वितीय हप्ता लाभार्थ्यांला आधार लीक असलेल्या बँक खात्यात मिळत असते.

संपूर्ण माहिती तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर मिळेल.

https://bit.ly/3nY37Lo

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *