शेतकऱ्यांवरील कर्ज होणार माफ
गेल्या अनेक दिवसांपासून कर्जमाफीची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळणार आहे. राज्यातील हजारो शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहे.२०१६ मध्ये अवसायनात निघालेल्या भूविकास बँकेकडील शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. भूविकास बँक ही एकेकाळी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेली बँक होती. याचा लाभ भूविकास बँकेकडून कर्ज घेणा-या राज्यातील ३३ हजार ८९५ थकबाकीदार शेतकऱ्यांना होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला.
जानेवारी २०१६ पासून जिल्हानिहाय बँका अवसायनात काढण्यात आल्या त्यामध्ये ही बँक देखील शामिल होती. १९३५ मध्ये य बँकेची स्थापना झाली होती.या बँकेकडून शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचं कर्ज मिळत होते.८६ वर्षं सुरू असलेला बँकेचा प्रवास अखेर थांबला खरा पण भूविकास बँकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळणार आहे. त्यासाठी ३४८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.