चण्याचे पाणी प्या आणि आरोग्य सुधारा
आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ मिळत नाही आणि त्यामुळेच वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण मिळते. या वेगवेगळ्या समस्यांवर घरगुती उपचारातून सुद्धा आपल्याला फायदा करून घेता येऊ शकतो. मधुमेह, अपचन आणि अशा अनेक आजारांसाठी संजीवनी म्हणजे चण्याचे पाणी. चणे रात्रभर पाण्यात भिजवून नंतर ते पाणी पिल्यास बद्धकोष्टता, अपचन आणि मधुमेहासारख्या अनेक आजारांवर गुणकारी ठरते.
काय आहेत लाभ :-
१) हे रात्रभर भिजवलेल्या चण्याचे पाणी सकाळच्या वेळी उपाशीपोटी प्यायल्यास भूक कमी लागते त्यामुळे वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवता येते.
२) दिवसातून ५-७ वेळा हे पाणी पिल्यास मूतखड्याची समस्या दूर होते.
३) जंकफूडमुळे शरीरात निर्माण होणारे विषारी पदार्थ शरीरातून बाहेर टाकण्याचे काम हे पाणी करते.
४) शरीरातील अशक्तपणा दूर करण्यासाठी आणि रक्तशुद्धी करून नवीन रक्त निर्माण करण्यासाठी याचा फायदा होतो.
५) सतत लघवीला जावे लागत असेल तर ही समस्या दूर करण्यासाठी चण्याच्या पाण्याचा उपयोग होतो.
६) मधुमेहग्रस्तांनी काळ्या चण्याचे पाणी प्यायला हवे, त्यामुळे शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण वाढत नाही.
टीप: तुमच्या आहारात बदल करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास आवश्यक