इतरब्लॉग

तर शेतकरी आत्महत्या नाही करणार

Shares

भारत हा शेतकऱ्यांचा देश असून येथील मूळ व्यवसाय शेती आहे, या वाक्यात थोडा बदल करून असे म्हणावे लागेल की हा देश आज गरीब शेतकऱ्यांसाठी योग्य नाही.विभक्त कुटुंब पद्धतीत वाटणी हिश्यात आलेली ४-५ एकर साधारण प्रतीची जमीन कसणारा शेतकरी सर्व प्रकारच्या प्रतिकूल परिस्थिती मुळे गांगरून गेला आहे.कुटुंबाच्या साध्या साध्या गरजा सुध्दा पूर्ण करणे आजही त्याला अशक्य आहे .माझ्या मते शेतकऱ्यांचे तीन प्रकार आहेत पहिले खरंच गरीब असा शेतकरी, ज्याच्याजवळ ४-५ एकर साधारण प्रतीची जमीन आहे,अशा शेतकर्यांजवळ उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही. हा कायम कर्जात असतो,शासकीय मदत याला सहज मिळत नाही ,याच्या मदतीच्या नावावर सगळे मध्यस्थ श्रीमंत होत आहेत. हा कायम धोक्यात असतो.

या देशाने ह्युमन कंपोस्टिंगला दिली मान्यता, मृतदेहापासून तयार करणार कंपोस्ट खत

देशातील दुसऱ्या प्रकारचे शेतकरी कुठेतरी नोकरी करून कुटुंबाचा चरितार्थ चालवतात .परिवार सुरक्षित ठेऊन जमेल तशी सफल शेती करतात.प्रतिकूल परिस्थितीवर काही प्रमाणात मात करतात.हे शेतकरी कधीही आत्महत्या करत नाहीत तिसऱ्या प्रकारचा शेतकरी धनाढ्य वर्गातील असुन नेहमीच सत्तेच्या, अधिकार पदाच्या समीप असतो.सगळ्या सोई-सवलती स्वतः या वर्गापर्यंत येऊन पोहोचतात.यांची शेतीवाडी म्हणजे पंचतारांकित पर्यटन स्थळ असते.लोकशाही व्यवस्था प्रणालीत यांचे व्यक्तिगत साम्राज्य तयार होते .

बाजरी 2023: जगातील सर्वात जुने पीक अजूनही मजबूत उत्पन्नाचे स्त्रोत आहे, जाणून घ्या काय आहे बाजरीमध्ये विशेष

हे कशाला आत्महत्या करतील ?

प्रत्येक क्षेत्रात विषमतेने परिपूर्ण असलेली आजची लोकशाही कोणत्या दिशेने प्रवास करीत आहे हे वेळीच ओळखावयास हवे.या व्यवस्था प्रणालीत गरीब शेतकरी,बेरोजगार,अल्प उत्पन्न असणारा,व्यवसायिक,श्रमिक कामगार वैफल्यग्रस्त झाले,हताश,निराश झाले तर नवल काय ?

कुक्कुटपालन : कोंबडी अंडी घालायला लागते म्हणून खाद्य कधी आणि किती घालावे, कोंबडीकडून अंडी घेण्याचा फंडाही जाणून घ्या!

आपल्या गावात कुणीही उपाशी राहू नये,प्रत्येकाला काम कसे मिळेल,जो समाज घटक हताश झाला त्याला एकजुटीने मदत करणे,सर्वच स्तरांचे भेदभाव संपवून बंधुभाव कसा निर्माण होईल,ही खरी लोकतंत्राची संकल्पना रुजवायला हवी .दुर्दैवाने आजचे वास्तव या संकल्पनेपासून कोसो मैल दूर आहे ,म्हणूनच आत्महत्या करणारा शेतकरी गरीब असून पूर्णपणे एकटा आहे.”सामुदायिक पद्धतीची शेतीव्यवस्था”* या गरीब असलेल्या शेतकऱ्यांचे एकटेपण दूर करू शकेल का ?हताश आणि निराश झालेल्या मनाला हवा आहे मदतीचा सशक्त हात.छोट्या छोट्या गावातील शेकडो हजारो हात जर एकत्रित झाले तर तिथे एकीचा चमत्कार घडेल.एकटेपणा संपून साथ आणि विश्वासाचं एक सशक्त जादुई वातावरण त्या गावात निर्माण होईल

प्रखर आत्मशक्तीची ताकद

एकत्रित होण्याने आजचं गढूळ दुहीचं वास्तव नाहीसं होईल.पुन्हा जगण्याला उभारी येईल,उमेद येईल.संपूर्ण गांव सोबत आहे,या जाणिवेने गरिबीतही विश्वासाची ऊब निर्माण होईल आणि मग – –

नाही करणार शेतकरी आत्महत्या

लेखसंग्रह

उजळते क्षितिज (२००७)

लेखक : – सुहास सोहोनी

मोबा : – ९४०५३४९३५४

अराजकतेच्या उंबरठ्यावर

7 वा वेतन आयोग: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा झटका, HRA वर मोठी अपडेट

आता मध व्यवसायात तोटा होणार नाही, शास्त्रज्ञांनी लावला मधमाशांचे संरक्षणात्मक आवरण, वाचा सविस्तर

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *