प्रखर आत्मशक्तीची ताकद
अपंगत्व, मग ते शारीरिक असो वा मानसिक, ते त्या व्यक्तीला पर्यायाने कुटुंबाला मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या त्रासदायक ठरत हे खरं आहे. जन्माने किंवा अपघाताने एकदा का या प्रश्नाचा एखाद्या कुटुंबात शिरकाव झाला कि त्या परिवाराला जणू एखाद्या युद्ध प्रसंगाला सामोरे जावे तसे या अपंगत्वावर मात करण्यासाठी झगडावे लागते. खऱ्या अर्थाने तन मन धनाने या निसर्ग इच्छेविरुद्ध युद्ध पुकारावे लागते. खूप मोठा काळ, अनेक वर्ष हा झगडा चालतो. अपंग व्यक्ती आणि तिचे माता पिता यांच्या हृदयाची कालवाकालव इतर कुणाला दिसली तरी त्या यातना त्यांच्या त्यांनाच सोसाव्या लागतात. निसर्गाने मानवावर मिळवलेला काही प्रमाणात विजय आहे.
नाशपातीच्या शेतीतून शेतकरी लाखोंची कमाई करू शकतात, जाणून घ्या दुप्पट नफा मिळविण्याचा सोपा मार्ग
पण नाही, याही प्रतिकूल परिस्थितीवर मात करून, खंबीर मनाने प्रचंड आत्मशक्तीच्या बळावर, केवळ दुर्दैवाने अपंगत्व लाभलेल्या मानवाने “हम भी कुछ कम नही” हे वेळो वेळी सिद्ध करून दाखविले आहे. आत्माशाक्तीची ताकद हि काय चीज आहे हे कळण्या करिताशेकडो उदाहरणे आहेत. सामान्य माणसाच्या बरोबरीने कितीतरी धाडसाची कामे अपंग व्यक्तीने केली आहेत. आणि पुढेही करणार आहेत. त्यांनी पर्वत शिखर काबीज केले आहेत. सागर ओलांडले आहेत, क्रीडा क्षेत्रांत नैपुण्य मिळवले आहे. शरीर अपंग असेल तर काय ! इच्छाशक्ती तर शाबूत आहे ना ? मग कोणतीही प्रतिकूल परिस्थिती असो त्यावर मात करणे हे खरे आव्हान, आणि आव्हानं हसत हसत स्वीकारून ध्येय प्राप्त करण हा त्याच निसर्गावर मिळवलेला विजय नाही काय ? या विजयाबद्दल ते खचितच अभिनंदनास पात्र आहेत, कौतुक करण्यास शब्द कमी पडतात.
राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन: 8 लाख कोटींची गुंतवणूक, 6 लाख लोकांना रोजगार, ही आहे सरकारच्या ग्रीन हायड्रोजन मिशनची संपूर्ण योजना
अपंगत्वाच्या हल्ल्यामुळे खचलेल्या, पूर्णपणे राख झालेल्या मनावर हळुवार फुंकर मारून पुन्हा मनाची उभारणी करणे म्हणजे राखेतून नवजीवन प्राप्त झालेला जणू फिनिक्स पक्षीच उत्पन्न करण्यासारखे आहे. हे काम सुद्धा एक आव्हानच आहे. मानवी समाजात जसे दुष्ट, गुंड प्रवृतीचे लोक आहेत, ज्यांची स्वार्थ आणि विध्वंस हि प्रवृत्ती आहे, त्याच समाजात अनेक संवेदनशील लोक आहेत जे दुःखितांचे दुःख दूर करण्यासाठी पुढे येतात, मदतीचा हात पुढे करतात, दुःखितांचे अश्रू पुसतात. आपण सगळे एकमेकांचे कुणीतरी आहोत हि संकल्पना दृढ करतात. आपण या समाजच देणे लागतो, हे भान त्यांना असत. माझ्या मते अपंगांसाठी केलेले कार्य देवतुल्य ठरत.
किसान कॉल सेंटर शेतकऱ्यांच्या प्रत्येक लहान-मोठ्या समस्या सोडवेल, टोल फ्री क्रमांक- 18001801551
अश्या व्यक्ती, संस्था, अपंगाच्या पुनर्वसनाकरिता अहोरात्र झटतात तेंव्हा कुठे काही प्रमाणात यश मिळते. काही अपंग व्यक्तींचे आयुष्य सुसह्य बनते. पण थोडं निरीक्षण केलं तर असं दिसत कि हे कार्य फार अफाट आहे. तसाच या प्रश्नाचा विस्तारही फार आहे. इतक्या संस्था काम करीत सतना सुद्धा हे कार्य कमी पडते असे वाटते. हा प्रश्न संपणारा नाही. नित्य नव्या आकारात हा प्रश्न समोर उभा थकतो, त्यामुळे हे कार्य सुद्धा संपणारे नाही. उपचार आणि पुनार्वासाच्या कार्याचा वेग आणि व्याप्ती वाढवणे आवश्यक ठरते पण याकरिता असंक्या हात मदतीकरिता स्वखुशीने पुढे झाले पाहिजेत. अपंग शरीरातील सुप्त आत्मविश्वास जग्रून केला पाहिजे. सुप्त गुणांची पारख करून ते विकसित केले पाहिजे.
चांगली बातमी! शेंगदाणा वगळता सर्व खाद्यतेल झाले स्वस्त, जाणून घ्या कोणत्या तेलाचे दर किती
आपण आपल्या शरीराच्या एखाद्या अवयवाला अपय झाला तर जशी काळजी घेतो तसे या समाजपुरुषाने आपल्याच एखाद्या अवयवाला अपाय झाला असे समजून काळजीपूर्वक उपाय करणे आवश्यक आहे. आपण केलेल्या मदतीत आपलेपणा हवा. स्वखुशी आणि आपुलकीच्या ओलाव्याने मदतीचा हात पुढे केल्यास या देवतुल्य कार्यास आपला हातभार लाऊन पुण्या कर्म केल्याचे समाधान मिळेल, आणि एखाद्या गुणी व्यक्तीच्या मनातील सुप्त आत्मविश्वास जागृत झाला कि पुन्हा एखादी “अपंग व्यक्ती” समुद्राच्या लाटेवर स्वर होईल . निसर्ग इच्छेविरुद्ध प्रचंड आत्मविश्वासान लढा द्यायला उभी राहील.
लेखक : सुहास सोहोनी
लेख संग्रह : वर्तुळाचे टोक [२००५]
विवेकानंद कॉलोनी, अमरावती ४४४६०६.
फोन : ०७२१-२५६७४६३, ९४०५३४९३५४.
7 वा वेतन आयोग: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा झटका, HRA वर मोठी अपडेट
आता मध व्यवसायात तोटा होणार नाही, शास्त्रज्ञांनी लावला मधमाशांचे संरक्षणात्मक आवरण, वाचा सविस्तर