रोग आणि नियोजन

संत्रा /मोसंबी फळपिकातील फायटोप्थोरा फळावरील तपकिरी रॉट वर उपाययोजना

Shares

सध्यस्थितीत पावसाची रिमझिम, अपुरा सूर्यप्रकाश, थंड हवा, अधिक आद्रता, कमी तापमान व शेतातील जमीन संपृक्त झाल्याने आंबिया बहारच्या फळांवर फायटोफ्थोरा बुरशीचे संक्रमण होऊन पाने काळी पडणे, पानगळ होणे व फळांवर तपकिरी डाग पडण्याची विकृती दिसून येत आहे. सदर फळगळ मूळे आर्थिक नुकसान संभवते.

फायटोफ्थोरा बुरशीचे पानावरील चट्टे लक्षणे:

पावसाळ्यात जमिनीलगतच्या फांद्यावरील पाने व फळांना ह्या बुरशीची लागण सर्वप्रथम होते. यामुळे पाने टोकाकडन करपल्या सारखी व मलल होतात. अशी पाने हातात घेतली असता त्यांचा चरा केला असता त्यांची घडी होते मात्र पाने फाटत नाहीत. टोकाकड़न झालेले संक्रमण पूर्ण पानावर होऊन पाने तपकीरी काळे होतात नंतर अशी पाने गळून झाडाखाली त्यांचा खच पडतो. फांद्या पर्णविरहित होतात झाड जणू खराटे सारखे दिसते. परिणामी अकाली फळगळ होते. पानावरील चट्टे संक्रमण रोपवाटिके मधील कलमा तसेच नकेतच लागवड केलेल्या कलमांवर सुद्धा दिसून पडतात.

फळावरील तपकिरी रॉट किवां फळावरील कूज लक्षणे:

पानांवर लागण झाल्यानंतर जमिनी लगतची हिरवी असलेली फळे यावर तपकिरी/करडया डागांची सुरवात होते, फळे एकाबाजूने करपण्यास सुरुवात होते. फळाच्या हिरव्या कातडीस संक्रमण होऊन पूर्ण फळ हे तपकिरी काळ्या रंगा मध्ये परावर्तीत होते व फळे सडून गळतात या फळ सडी च्या अवस्थेस ‘ब्राऊन रॉट’ किवां तपकिरी रॉट असे संबोधतात. फळे खाली पडल्यानंतर फळांच्या पृष्ठभागावर पांढर्याअ बुरशीची वाढ दिसून येते. करडया रंगाची फळे यांची तोड केल्यानंतर ते निरोगी फळात मिसळल्यास निरोगी फळे पण सडतात.

फायटोफ्थोरा रोगापासून होणारी फळगळ व्यवस्थापना करिता खालील उपाययोजना कराव्यात

• सर्वप्रथम खाली पडलेल्या पानांची व फळांची विल्हेवाट लावावी ती शेतात तसीच राहू देऊ नये अन्यथा या

रोगाची तीव्रता वाढण्यास मदत होऊन संक्रमण जलद गतीने होते. वाफा स्वछ ठेवावा. बागेच्या उताराच्या बाजने शेतातील पाणी बाहेर काढावे कारण जिकडे पाणी साठन राहते त्या भागात फायटोफ्थोरा बुरशीची लागण अधिक होते. फायटोफ्थोराफळावरील तपकिरी रॉटमुळे होणार्याशी फळगळ साठी संपूर्ण झाडावर फोसिटिल एएल २.५ ग्रॅम किवा कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्लूपी २.५ ग्रॅम किवा कॅप्टन ७५ डब्लूपी २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करावी.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *