तोंड आल्यावर आराम देणारे सोपे घरगुती उपाय
रोजच्या भाज्यामध्ये आपण मसाल्याचा वापर करत असतो त्यामुळे बऱ्याचदा आपले तोंड येते. यालाच तोंडातील छाले किंवा तोंडाचा अल्सर असे सुद्धा म्हणले जाते. तोंड आल्यावर कोणताही पदार्थ खाताना आपल्याला असह्य वेदना होतात. हा त्रास आपण काही घरगुती उपायांनी वेळीच टाळू सुद्धा शकतो.
हे उपाय करा :-
१) कोथिंबीर पाट्यावर वाटून तिचा रस तयार करून अल्सरवर लावल्यास आराम मिळतो.
२) शरीरातील उष्णता वाढल्यावर हा तोंडाचा त्रास होतो त्यासाठी धने या पदार्थाचा वापर केला जातो. साध्या पाण्यामध्ये धने टाकुन उकळून घ्यावे. हे पाणी थंड करून त्याने गुळणा केल्यास तोंड बरे होऊ शकते.
३) तोंड आल्यावर विलायची (वेलची) देखील फायदा देते. मिक्सरमध्ये विलायची पूड करून ती मधामध्ये मिक्स करून तोंडातील जळजळणाऱ्या भागावर लावल्यास पुष्कळ प्रमाणात आराम मिळतो.
४) जाईच्या झाडांची पाने स्वच्छ धुऊन तो पाला चावावा. यामुळे जळजळ कमी होते.
५) पेरूच्या झाडाचे पाने पाण्यामध्ये उकळून गुळणा केल्यावर त्रास कमी होतो.
६) साध्या पाण्यामध्ये हळद मिसळून ते पाणी गाळून घ्यावे आणि गुळणा करावा किंवा हळदीऐवजी मधाचा वापर करावा यामुळे तोंड कमी होते.
अश्याप्रकारे काही घरगुती उपाय करून आपण तोंड आल्याने होणाऱ्या त्रासापासून सुटका मिळवू शकतो. यामुळे तोंडामधील जळजळणाऱ्या भागाला जास्त आराम मिळतो.