धानावरील तुडतुड़यांचे एकात्मिक व्यवस्थापन
तुडतुड़या या किडीच्या वाढीसाठी उष्ण व दमट हवामान पोषक असते. सदयस्थितीत असे वातावरण आहे त्यामुळे धान पिकावर तपकिरी तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तपकिरी तुडतुड्यांची प्रौढ व पिल्ले धानाच्या रोपातील रस शोषण करून जगतात. तुडतुड्यांच्या रस शोषणामुळे झाड कमजोर बनते व पिक करपल्यासारखे दिसते. या किडीच्या लाळेतून विषाणू झाडात जातात. ल्यामुळे धानाचे पिक गवतासारखे खुरटलेले दिसते व लोच्या जळल्यासारख्या दिसतात.
तरी शेतकरी बांधवांनी आपल्या पिकाचे नियमित सर्वेक्षण करावे. सर्वेक्षणासाठी प्रत्येक बांधीतील वेगवेगळ्या ठिकाणावरील १० चुडांचे निरिक्षणे घ्यावीत व धानाच्या युध्यावरील तुडतुड्यांची संख्या मोजून सरासरी प्रति घुड किती तुडतुड़े आहेत हे मोजून घ्यायेत. १० तुडतुड़े प्रति पुड़ रोधणी ले फुटवे अवस्थेपर्यंत. २० तुडतुड़े प्रती पुड फुटये ते दुधाळ अवस्थेपर्यंत आठळल्यास नियंत्रणाचे उपाय गोजायेत.
१. तुडतुड्यांच्या टेहाळणीसाठी प्रकाश सापळयांचा वापर करावा.
२, तुडतुड्यांचा प्रादुर्भाव झाल्यास बांधीतील पाणी सोयीनुसार 3 ते 4 दिवसासाठी बाहेर सोडाये,
३. तुडतुड़यांचा प्रादुर्भाव असल्यास नियंत्रणासाठी मेटेरायझीयम अनिसोप्ली १.१५ टक्के भुकटी (1 x108 CFU/em min Act. No. MTCC-5173) या जैविक बुरशीचा २.५ कि/हे या प्रमाणात बांधीमधे वापर करावा. जैविक बुरशीमुळे तुडतुड्यांचा नियंत्रणास साधारणत: ७ ते ८ दिवसाचा वेळ लागतो. तुडतुड्यांच्या प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर असल्यास आयशकतेनुसार रासायनिक किटकनाशकांचा वापर करावा.
४. भक्षक व इतर परोपजीवी किटकांचे संवर्धन व संरक्षण करावे,
५. तुडतुड्यांनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडलाच नियंत्रणासाठी बुप्रोफेन्जीन २५ टकके प्रवाही १६ मिली किंवा इमिडाक्लोप्रीड १७.८ एसएल २.२ मिली किंवा फिप्रोनील ५ एससी २० मिली किया ट्रायझोफॉस ४० टक्के प्रवाही १२.५० मिली किंवा इथोफेनप्रोक्स १० टक्के प्रवाही १० मिली किंया फलोनीकेमीड ५० टक्के ३ ग्रॅम किंवा थायोमेवाझाम २५ डब्ल्युजी २ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
६. तुडतुड्यांच्या टेहाळणीसाठी जेथे प्रकाश सापळयांचा वापर केलेला आहे. अशा बांधीमधे तुडतुडयाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात राहतो म्हणुन अशा बांधीत वरील किटकनाशकांची फवारणी जरूर करावी.
७. फवारणी करतांना फवारणीचा झोत धानाच्या बुंध्यावर असावा. फवारणीसाठी साध्या पंपाकरीता पिकाच्या अवस्थेनुसार शिफारसीत ३०० ते ४०० लिटर पाणी वापरावे. पावर पंपाकरीता १०० ते १८० लिटर पाणी वापरावे. वरील दोन्ही पंपाकरीता फवारणीसाठी हेक्टरी लागणारे किटकनाशकांचे प्रमाण सारखे ठेवावे. एकाच किटकनाशकाचा वापर सतत करू नये…