रोग आणि नियोजन

बीटी कपाशीवरील रस शोषक कीडींचे व्यवस्थापन …

Shares

कापूस पिकावर सुरवातीच्या काळात प्रामुख्याने मावा, तू-तूड़े आणि फुलकिडे हया रसशोषक कीडीचा प्रादूर्भाव आढळून येतो. कोरडवाहू कापूस पिकावर मावा हया कीठीचा प्रादूर्भाव जुलैच्या दूस-या आठवडयापासून आढळून येतो तर तूलतूम्यांचा प्रादूर्भाव जूलैव्या शेवटच्या आठवडयापासून व फुलकीच्यांचा ऑगस्टच्या पहिला आठवडयापासून आढळून येतो. सदयस्थित या किडीचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन शेतकरी बंधूंनी आपल्या पिकाचे नियमित सर्वेक्षण करून त्या किठीनीआर्थीक नुकसानीची पातळी गाठताच (सरासरी १० रसशोषक कीली प्रति पान ) नियंत्रणाचे ऊपाय योजावेत.

मावा ही कीड रंगाने पिवळसर किंवा फिक्क्ट हिरवी असून आकाराने अंडाकृती गोल असते. मावा पानाच्या खालच्या बाजूने आणि कोवळ्या शेळयावर समुहाने राहून त्यातील रस शोषण करतो. प्रादूर्भावग्रस्त पाने प्रथम निस्तेज होवून नंतर कोकळतात त्यामूळे झाडाची वाळ खूटते या शिवाय मावा आपल्या शरीरातून गोठ चिकट द्रव बाहेर टाकतात त्यामूळे झाडे चिकट व काळसर होतात.

तूतूड़े फिवक्ट हिरव्या रंगाचे असून पाचरीच्या आकाराचे असतात. तूतूड़यांच्या पिलांना पंख नसतात आणि ते नेहमी लांबीला तिरके चालतात. तूतूड़े पानाच्या खालच्या बाजूला राहून त्यातील रस शोषन करतात अशी पाने प्रथम कलेने पिवळसर होवून नंतर तपकिरी रंगाचे होतात. जास्त प्रादूर्भाव झाल्यास संपूर्ण पाने लाल तांपळी होवून त्यांच्या कळा मूरगळतात. परिणामी झाडाची वाढ झूटते आणि अशा झाडांना पात्या, फूले आणि बोडे कमी प्रमाणात लागतात.

फूलकिडे आकाराने लहान व लांबोळे असून त्यांची लांबी १ मी.मी. किंवा त्यापेक्षा कमी असते. रंग फिकट पिवळा किंवा तपकिरी असतो. फुलकिडे आणि त्यांची पिले कपाशीच्या पानावरील आणि बोंडावरील हिरवा भाग खरडून त्यातून निघणारा रस शोषण करतात. प्रथम तो भाग पांकूरका आणि नंतर तपकिरी होतो. झाडाची वाढ खूटते आणि बोंडे चांगली उमलत नाही.

रस शोषक कीडींसाठी कपाशीचे पिकाचे प्रादूर्भाव बाबत सर्वेक्षण करावे. सरासरी संख्या १० मावा/पान किंवा २ ते ३ तूतूड़े/पान किंवा दहा फूलकीड/पान किंवा मावा, तूतू आणि फुलकिडे यांची एकत्रित सरासरी संख्या दहा/पान किंवा त्यापेक्षा जास्त आढळून आल्यास नियंत्रणासाठी रासायनिक किटकनाशकाची वापर करावा.

 एकीकृत व्यवस्थापणः

  • वेळोवेळी प्रादूर्भावग्रस्त फांदया, पाने, इतर पालापाचोळा जमाकरून किडीसहीत नष्ट कराव्या
  • कपाशीचे पीक हंगामाबाहेर घेण्याचे टाळावे कारण त्यामूळे किठीला अखंड अन्नपुरवठा उपलब्ध होत राहून त्या पुढील हंगामातील पिकांवर लवकर आकमण करून सहज वाढू शकतात.
  • कापूस पीकाची योग्य पीक फेरपालट करावी.
  • पानावर लव असलेल्या बीटी कपाशीच्या संकरीत जातीची निवड करावी. अशा जाती तुडतुन्यांना प्रतिकारक असून त्यामुळे आपल्याला रासायनिक किटकनाशकांच्या फवारणीची संख्या हमखास कमी करता येते.
  • कपाशीत चवळीचे आंतर पीक घ्यावे या चवळी पीकावर कपाशीवरील किडीच्या नैसर्गिक शत्रू किटकांचे पोषण होईल
  • वेळेवर आंतर मशागत करून पीक तणविरहीत ठेवावे त्यामुळे किडीच्या पर्यायी खाघ तणांचा नाश होईल. तसेच बांधावरील किडीच्या पर्यायी खादयतणे जसे अंपाठी, रानभेंडी ई.नष्ट करावी
  • मृद परीक्षणाच्या आधारावर खतमात्रेचा अवलंब करून दोन ओळीतील व दोन झाडातील अंतर योग्य तेच ठेवावे आणि जास्तीचा नत्र खताचा वापर टाळावा जेणेकरून कपाशीची अनावश्यक कायीक वाढ होणार नाही आणि पीक दाटणार नाही पर्यायाने अशा पीकावर किडही कमी प्रमाणात राहील.
  • बीटी कपाशीच्या बियाण्याला ईमाठाक्लोप्रीत किंवा थायोमेझोक्साम किटकनाशकांची बिज प्रकीया केलेली असते. त्यामुळे रस शोसक या किडीपासून सर्वसाधारण २ ते ३ आठवच्या पर्यंत संरक्षण मिळते म्हणन या काळात किटकनाशकांची फवारणी कस नये.
  • रस शोषक किडीवर उपजिवीका करणारे नैसर्गिक किटक उदा. सीरफीउ माशी , कालीन , कालकिडे, कायसोपा, अॅनॅसयीस प्रजातीचा परोपजीवी किटकई संख्या पूरेशी आढळून आल्यास रासायनिक किटकनाशकांचा वापर टाळावा.
  • लक्षणीय प्रादुर्भाव असल्यास रस शोषक किडीच्या नियंत्रणासाठी ५ टक्के निषोळी अर्काची फवारणी करावी किंवा अॅझाडीरेक्टीन ०.०३ टक्के निंबोळी तेल आधारीत डब्लू.एस. पी. ३०.०० मिली किंवा अॅझाडीरेक्टीन ५.०० टक्के (डब्लू/डब्लू एन.एस.के.ई.)२० मिली
वरील सर्व उपाययोजनांचा अवलंब करूनही किडीनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्याचे आढळून आल्यास खालील कोणत्याही एका रासायनिक किटकनाशकांची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. प्रत्येक फवारणीला एकच एक किटकनाशक न वापरता आळीपाळीने त्यांचा वापर करावा.

प्रोफेजीन २५ टक्के प्रवाही २० मि.ली., डॉयफ्रेंच्युरॉन ५० टक्के पा. मि. भूकटी १२ गम किंवा फिप्रोनिल ५ टक्के प्रवाही ३० मि.ली., इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के २.५ मि.ली., किंवा प्रोफेनाफॉस ५० टक्के प्रवाही २० मि.लि.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *