बर्डफ्लूमुळे ३ दिवसात ३१ हजार कोंबड्यांचा मृत्यू
पोल्ट्री फार्ममधील हजारो कोंबडया अज्ञात आजाराने अचानक मृत्युमुखी पडल्या होत्या. त्यानंतर फार्म मधील कोंबड्यांची तपासणी केल्या नंतर असे निदर्शनास आले की त्या कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूने झाला आहे. या कोंबड्यांची तपासणी भोपाळ येथील सुरक्षा पशुरोग संस्थानने केली असून १२ हजार ते १३ हजार कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे. पोल्ट्री व्यावसायिकांच्या पोल्ट्रीमधील पक्ष्यांची विल्हेवाट लावण्यास सुरुवात केली असून हजारो पक्षांची विल्हेवाट लावण्यात आली आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यवसाय असणाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
३१ हजार ८१७ कोंबड्या ३ दिवसात नष्ट करण्यात आल्या..
बर्डफ्लूमुळे शहापूर आणि वसई विरारमध्ये तीन दिवसांत ३१ हजार कोंबड्या शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यात आल्या आहेत. शहापूर तालुक्यातील वेहळोली येथील मुक्तजीवन सोसायटीच्या फार्ममध्ये देशी कोंबड्या व बदकांचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर एक किलोमीटर अंतराच्या परिघातील पोल्ट्री फार्ममधील २३ हजार ८१७ कोंबड्या तीन दिवसांत नष्ट करण्यात आल्या असून यामध्ये ४५० गावठी कोंबड्यांचा समावेश आहे. अर्नाळ्यातही शुक्रवार आणि शनिवारी पाच विशेष पथकांनी सर्च ऑपरेशनद्वारे ७ हजार कोंबड्या मारल्या आहेत. शहापूर येथे आता बाधित क्षेत्रापासून १० किमीच्या अंतरावरील गावांमध्ये जाऊन कोंबड्यांचे नमुने घेऊन ते परीक्षणासाठी पाठविण्याचे काम सुरू झाले आहे, असे पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दर्शन दळवी यांनी सांगितले.