वीस वर्ष मोफत वीज मिळणार.
काही दिवसांपासून महागाई वाढतच चालली आहे. त्यात पेट्रोल , डिझेलचे भाव तर आकाशाला भिडत आहेत. त्यात इंधनाची वाढती मागणी सर्वसामान्यांसाठी एक डोकेदुखीच झाली आहे. त्यात अजून एक भर म्हणून विजेच्या दरात देखील वाढ होत आहे. त्यामुळे नागरिक अधिक परेशान झाले आहेत. यावर उपाय म्हणून शासन सौर ऊर्जा वापरण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. सूर्य म्हणजे कधीही न संपणारा ऊर्जास्रोत आहे. त्यामुळे केंद्र शासन सोलर रूफ टॉप बसवण्यासाठी अनुदान देणार आहेत. या अनुदानाबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत.
सोलर रूफ टॉप अनुदान योजना –
१. केंद्र शासनाकडून ३ किलो वॅट पर्यंत टॉप पॅनल स्थापित करण्यासाठी चाळीस टक्क्यापर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.
२. या अनुदानांतर्गत ३ किलो वॅट ते १० किलो वॅट पर्यंत २० % सबसिडी मिळणार आहे.
३. य योजनेअंतर्गत तुमच्या घराच्या छतावर सोलर रुफटॉप बसवून ३० ते ५० टक्क्यांनी विजेचा खर्च कमी करणे शक्य होणार आहे.
४. या योजनेचा खर्च ५ ते ६ वर्षात दिला जाऊन २५ वर्षासाठी वीज पुरवण्यात येणार आहे.
५. सौर ऊर्जेसाठी आवश्यक असणारे सौर पॅनल बसवण्यासाठी घराच्या , फॅक्टरीच्या छतावर १ किलोवॅट सौर ऊर्जेसाठी १०० चौरस मीटर जागेची आवश्यकता असते.
६. वीज वितरण कंपनीच्या जवळच्या कार्यालयाशी संपर्क साधून या योजनेची अधिक माहिती मिळवता येते.
या योजनेचा अधिक लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर जवळच्या वीज वितरण कंपनीशी संपर्क साधावा.