शेतकऱ्यांचा अपघातात मृत्यू झाल्यास २ लाख तर अपंगत्व आल्यास १ लाख
शेतकरी वर्ग शेतीमध्ये काम करीत असताना कायमच अपघात होण्याची शक्यता असते. सर्पदंश, विचू चावणे, विजेचा शॉक लागणे, पाण्यात बुडून अशा अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू होतो. परिणामी घरातील कर्ता पुरुष दगावल्याने कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न बंद होते. अशा परिस्थितीत अपघातात मृत्यू झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजनेअंतर्गत शासनातर्फे २ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाते.
हे ही वाचा (Read This) काळ्या हळदीची लागवड करून मिळवा ‘पिवळ्या’ हळदीपेक्षा १० पट भाव
काही दिवसांपूर्वी मध्यंतरी शेतकरी अपघात विमा योजनेची प्रक्रिया खंडित करण्यात आली होती. या काळात नुकसान भरपाईसाठी दावे दाखल झाले होते. मात्र प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होत नव्हती. आता लवकरच संबंधितांच्या खात्यावर रकम जमा केली जाणार आहे.
शेतकरी अपघात विमाच्या रकमा त्वरित बँक खात्यामध्ये जमा करण्याच्या सूचना कृषी आयुक्ताने दिल्या आहेत. आता शेतकरी कुटुंबांना अनेक दिवसानंतर थोडा दिलासा मिळाला आहे.
कृषी आयुक्तालयाने विमा योजना खंडित असतांना आलेल्या शिफारशी राज्य सरकारकडे पाठविल्या असून यास आता मंजुरी मिळाली आहे.
हे ही वाचा (Read This) सरकारी नौकरी 2022: बँक ऑफ इंडियामध्ये अनेक पदांसाठी मेगा भरती, असा करा अर्ज
या योजनेचे स्वरूप
अपघातामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबास २ लाख रुपये आणि जर त्यांना अपंगत्व आले तर १ लाख रुपये देण्यात येणार आहे. आता पर्यंत २३ कोटी ३६ लाख अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना ही रक्क्म मिळणार आहे.
अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय तसेच एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास दोन लाख रुपये भरपाई दिली जाते. अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास एक लाख रुपये भरपाई मिळते.
हे ही वाचा (Read This) गुलखैरा शेती : या औषधी वनस्पतीचा लागवड करून कमी दिवसात दुप्पट नफा मिळवा
कोणाला लाभ मिळत नाही ?
आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किवा जाणीवपूर्वक स्वत:ला जखमी करुन घेणे, गुन्ह्यांच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात, अमली पदार्थांच्या नशेतून अपघात, स्त्रियांचा बाळंतपणातील मृत्यू, शरीरांतर्गत रक्तस्राव, मोटार शर्यतीतील अपघात, युद्ध सैन्यातील नोकरी आदी घटनांचा या विमा संरक्षणात समावेश नाही.
हे ही वाचा (Read This) शेतीमध्ये आगळावेगळा प्रयोग, १० गुंठे शेतीतून मिळवतोय ५ लाखांचे उत्पन्न
अपघात विमा मिळण्याची प्रक्रिया काय आहे ?
शेतकऱ्याचा अपघात झाल्यास पोलीस अपघात झाल्यास पोलिस पंचनामा, पोस्टमार्टम रिपोर्ट, सातबारा, आठ ‘अ’, ६ क, ६ ड, मृत्यृ प्रमाणपत्र, ज्यांचा अपघात झाला आहे त्या शेतकऱ्याचे वारसा प्रमाणपत्र, वारसा अर्जदार आदी कागदपत्रे ही कृषी विभागात जमा करावी लागतात.
नियुक्त केलेल्या कंपनीकडे कृषी विभाग कागदांची पूर्तता करतात. त्यानंतर योग्य चौकशी नंतर शेतकऱ्यास किंवा शेतकऱ्यांच्या कुटुंबास ही विमा रक्कम दिली जाते.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या संकेतस्थळावर क्लिक करा
http://krishi.maharashtra.gov.in/1246/Gopinath-Munde-Farmers-Accident-Insurance-Schemes
हे ही वाचा : आता औरंगाबाद-पुणे प्रवास फक्त सव्वा तासात, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा