‘बाबो’ दिवसाला १२ लिटर दूध देणार हि शेळी … फायदाच फायदा!
शेतीसोबतच शेळीपालन हा व्यवसाय बहुतांश ठिकाणी केला जातो. नफा मिळवून देणाऱ्या या जोडधंद्याबद्दलची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे अतिशय आवश्यक आहे. शेळीपालन व्यवसाय करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये भर पडण्यास मदत होते. वेगवेगळ्या उद्देशानुसार विविध जातीच्या शेळ्या पाळल्या जातात. दुग्धव्यवसायाच्या विचार करता वेगळ्या जातीच्या शेळ्यांचे संगोपन केले जाते ज्यात दिवसाला 12 लिटर दुध देणारी शेळीची संकरित जात उपयोगात येते. तर मांसासाठी वेगळ्या जातीच्या शेळ्यांचे संगोपन केले जाते.
दूध उत्पादनात महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. दूध उत्पादनात अधिक वाढ होण्याच्या उद्देशाने सरकार नवनवीन प्रयोग करत आहे. राज्यात प्रतिदिन 12 लिटर दुध देणाऱ्या प्रजातीची "सानेन शेळी" आणून तिच्यावर संशोधन करण्याचे नियोजन सरकार करत आहे.
विविध प्रकारच्या शारीरिक समस्यांवर शेळीचे दूध म्हणजे जालीम उपायच. शेळीपालन हा शेतीला पूरक आणि फायदेशीर असा जोडधंदा आहे.
यासोबतच महाराष्ट्र राज्य हे दूधउत्पादनात आघाडीवर असल्यामुळे सरकार या व्यवसायाची भरभराट होण्यासाठी आणि शेळी संवर्धनात भर पाडण्यासाठी आणखी प्रयत्न करत आहे.म्हणूनच सानेन प्रजातीच्या शेळीवर संशोधन होणार आहे. 260 दिवसात सुमारे 3200 लिटर दुध देणाऱ्या सानेन शेळीचा भाकड काळ हा 105 दिवसांचा आहे. गावठी शेळ्यांच्या तुलनेने जास्त दूध देणारी सानेन शेळी अधिकचे उत्पन्न देऊन जाते. व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा
ब्युरो रिपोर्ट – किसानराज डेस्क