राज्यातील ऊस उत्पादक चिंतेत ! तब्बल ५६०० कोटी एफ आर पी थकित…
कोल्हापूर- महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम यंदा निम्म्यावर आला असला तरी, डिसेंबर २०२४ अखेर गाळप झालेल्या उसाची एफआरपी (केंद्र सरकारने ठरवलेला मूल्य) सुमारे ५६०० कोटी रुपयांपर्यंत थकीत आहे. साखर माल तारण खात्यावर बँकांकडून पैसे मिळत नसल्यामुळे कारखान्यांची कोंडी झाली आहे, तसेच शेतकऱ्यांची परिस्थितीही बिकट झाली आहे. यंदा विधानसभेच्या निवडणुकीमुळे राज्यातील साखर कारखान्यांचा हंगाम २० नोव्हेंबरनंतरच सुरू झाला, ज्यामुळे हंगामाची सुरुवात उशिरा झाली. हंगामाच्या प्रारंभात साखरेचे दर प्रतिक्विंटल ३३०० रुपये होते, परंतु संक्रांतीच्या सणामुळे सध्याच्या बाजारात साखरेचे दर ३५०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.