शेतातील पाण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी शेतकऱ्याने केला अप्रतिम जुगाड, व्हिडिओ पाहून मन थक्क होईल

Shares

सोशल मीडियावर आजकाल एका शेतकऱ्याचा जमिनीखालून शेतीसाठी पाणी काढण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, जो भौतिकशास्त्राच्या नियमाचा वापर करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

आपला देश हा कृषीप्रधान देश आहे, जिथे आजही पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. त्याचबरोबर झपाट्याने बदलणाऱ्या हवामानामुळे अनेक राज्यांमध्ये वेळेवर पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांना त्यांची पिके उद्ध्वस्त होताना पाहावी लागत आहेत. सद्यस्थितीत असे अनेक शेतकरी आहेत की, जे आपल्या प्रत्येक समस्येतून सहजपणे सुटका करून घेताना दिसतात.

हे ही वाचा (Read This) Summer Special: उन्हाळ्यात अति थंड पाणी पिण्याचे टाळावेत, माठातील पाणी पिणे अधिक फायद्याचे

अलीकडच्या काळात देसी जुगाडचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत. ज्यामध्ये लोकांना अशक्य वाटणारी कामे सहजपणे करतांना पाहून वापरकर्ते खूप प्रभावित होतात, आता सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये एक शेतकरी आपल्या शेतीसाठी पाण्याच्या समस्येला तोंड देण्यासाठी भौतिकशास्त्राची मदत घेताना दिसत आहे.

वास्तविक, व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये एक शेतकरी दोरी न ओढता विहिरीतून पाणी काढण्यासाठी भौतिकशास्त्राचे नियम प्रत्यक्ष जीवनात लागू करताना दिसत आहे. ज्याला पाहून सर्वजण त्याच्याकडे आश्चर्याने पाहत आहेत. हा व्हिडिओ IFS अधिकारी प्रवीण कासवान यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे.

व्हिडिओ शेअर करताना प्रवीण कासवान यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘पाण्याची किंमत… पाहा भौतिकशास्त्राचा वापर करून ते कसे सोपे केले गेले. हे राजस्थानमधील एखाद्या ठिकाणचे आहे. सध्या सोशल मीडियावर एका शेतकऱ्याच्या या देसी जुगाडचा व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झाला आहे. बातमी लिहेपर्यंत या व्हिडिओला 3५हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर ३ हजारांहून अधिक लाईक्सही मिळाले आहेत.

हे ही वाचा : आता औरंगाबाद-पुणे प्रवास फक्त सव्वा तासात, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *