उन्हाळी सोयाबीनची शेवटच्या महिन्यात अशी घ्या काळजी

Shares

काळानुसार पीक पद्धतीमध्ये बदल झाला असून शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या आव्हानानंतर सोयाबीन प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामात देखील शेत शिवार हे हिरवेगार दिसत आहेत.
आतापर्यंत सर्व सुरळीत सुरु असले तरी शेतकऱ्यांना उत्पादन वाढीची अपेक्षा आहे. मात्र सोयाबीनच्या पिकांना शेंगा अजून आल्या नाहीत तर काही ठिकाणी शेंगा आल्या आहेत मात्र शेंगांचे वजन पेलत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.

हे ही वाचा (Read This) कृषी तंत्रज्ञान: सेन्सरवर आधारित सिंचन पद्धतीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार !

मळणी करतांना घ्या ही काळजी

सोयाबीन मळणीचे नियोजन करणे गरजेचे असते. सोयाबीनच्या झाडांची पाने वाळण्यास सुरुवात होताच त्याचे नियोजन करण्यास सुरुवात करावीत.
मळणी सुरु करतांना हवामानाचा अंदाज घेणे गरजेचे आहे. त्याच्या अनुषंगानेच सोयाबीन काढणीचा कार्यक्रम करावा लागतो. आता मात्र मजुरांची टंचाई लक्षात घेता योग्य अश्या वेळी काढणी तसेच मळणी यांचे नियोजन करणे गरजेचे आहे.

हे ही वाचा (Read This) या पिकाची लागवड करा ३ वर्षे नो टेन्शन, मिळवा ६ लाखांपर्यंतचे उत्पन्न

लागवड खर्चामध्ये अधिकची भर

उत्पादन वाढ व्हावी रस्ताही शेतकरी दिवस रात्र एक करत आहेत. मात्र वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलामुळे फवारणी, निगराणी याचा अधिकच खर्च वाढला आहे. तर सोयाबीन हे पावसाळी पीक असले तरी अतिवृष्टी मुळे पिकांचे मोठ्या झाले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात या पिकाची लागवड करून अधिकचे उत्पन्न मिळवता येईल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली आहे.

हे ही वाचा (Read This)  शेवगा लागवड करून मिळवा अधिक उत्पन्न, सरकार देणार अनुदान

नेहमी ४ वेळा कराव्या लागणाऱ्या फवारण्या आता १० वर गेल्या आहेत. वातावरणात बदल सुरु झाला असून काढलेले सोयाबीन हे पावसात भिजणार नाही याची काळजी शेतकऱयांना घ्यावी लागणार आहे. शेतकऱयांना सोयाबीनची काळजी योग्य पद्धतीने घ्यावी लागणार आहे जेणेकरून नुकसान होणार नाही तसेच अधिकचे उत्पन्न मिळेल.

हे ही वाचा (Read This) निंबोळी अर्क व उपयोग

सोयाबीनची घ्या अशी काळजी

काही क्षेत्रावर सोयाबीनची पाने झाडं वाळू लागतात. आशा वेळी झाडांची मुळी बंद झाली आहे. त्यामुळे अशा वेळी म्युरेट ऑफ पोटॅश(पालाश) एक किलो प्रति एकर ह्या प्रमाणात फवारणी केल्यास जमिनीतून पालाश ह्या अन्नद्रव्यांची अपव्यय होत नाही. शिवाय वरून फवारणी केल्यास त्याचा चांगला परिणाम आपणास मिळतो.

सोयाबीनच्या झाडांची अजूनही मुळी सुरु असल्यामुळे पालाशचे शोषण होऊन उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे. सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी घेतल्यामुळे सोयाबीनचे दाणे भरण्यास मदत होते.

हे ही वाचा (Read This)  राज्यातील ‘या’ शहरात येणारी लाखोंची बनावट दारू जप्त

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *